शेतात जायला रस्ता नाही का? फक्त एक अर्ज करा, सरकारी खर्चातून करून मिळेल शेतातील रस्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | शेतात रस्ता नसल्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. शेतातील माल बाजारामध्ये नेने. यंत्र सामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्याला बारमाही रस्ता लागतो. परंतु गावामध्ये नकाशात नोंद असतानाही काही शेतकऱ्यांना विरोध व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे तो रस्ता होत नाही. व अशावेळी काय करावे शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. परंतु आता जिल्ह्यातील तीन हजार सहाशे शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पांदण किंवा शेत रस्ता करून दिला जाणार आहे. दुष्काळाच्या रोहायो आराखड्यात त्या रस्त्यांचा समावेश करण्यात आला असून पहिले टप्प्यामध्ये 844 रस्ते होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्येमुळे शेत रस्ता कोणत्याही योजनेमध्ये समावेश नसल्याने शासनाने विविध स्त्रोतामधून निधी उपलब्ध करून बांधन किंवा शेत रस्ता योजना राबवण्याची महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी 2018 रोजी यासंदर्भातील शासन निर्णय काढला होता. तसेच महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची वर्गवारी केली.

दरम्यान वित्त आयोगाच्या निधी व खासदार आमदाराच्या स्थानिक विकास निधी ग्रामपंचायतेकडील जन सुविधांसाठीचे अनुदान, मोठ्या ग्रामपंचायत कडील नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान, गैनखनिज विकास निधी, ग्रामपंचायतचे महसूल अनुदान, जिल्हा परिषद पंचायत समिती कडील सेसमदील निधी, ग्रामपंचायत उत्पन्नातील निधी, आशा मधून पांदन किंवा रस्ते करण्याचे शासनाचे आदेश आहेत. एका किलोमीटर साठी अंदाजे 25 लाखापर्यंत खर्च केला जातो. जॉब कार्ड असलेल्या मजुरांद्वारे या पांदण रस्त्यांचे कामे यंदा केली जाणार आहेत. मंजुरांना दररोज २७८ रुपयांची मंजुरी मिळणार आहे.

गाव नकाशात आहेत रस्त्यांची नोंदी

ग्रामीण रस्ते व ग्रामीण हद्दीचे रस्ते गाव नकाशामध्ये दोन भरीव रेषेने दर्शविलेले आहेत. या रस्त्यांची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांक समाविष्ट नाही. ग्रामीण गाडी मार्ग गाव नकाशा तुटक दुबार रेषेने दाखवले असून त्यांची नोंद साडेसहा ते 21 फूट आहेत. पाय मार्ग तुटक एका रेषेने दाखवले असतात. आणि त्यांची रुंदी सव्वा आठ फूट असते. शेतावर जाण्याची पायमार्ग व गाडी मार्ग नकाशावर दाखवले नाहीत. परंतु वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदारांना आहेत.

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?

  • जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगल जावे लागेल.
  • त्यानंतर mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • त्यानंतर त्या पेजवर तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन हा रकाना दिसेल.
  • त्याला कशावर क्लिक करून तुमचे राज्य कॅटेगरीमध्ये रुलर आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुलर हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचे नाव भरायचे आहे सगळ्यात शेवटी विलेज मॅप या बटणावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची शेत जमीन ज्या गावात येते त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो.
  • होमिओपार्‍यासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.

(Disclaimer | वरील दिलेली माहिती सरकारी वेबसाईटच्या आधारे आहे जर तुम्हाला कुठलीही माहिती कमी वाटलीस तर तुम्ही सरकारी कार्यालयाची भेट द्या)

Leave a Comment

error: Content is protected !!