Agriculture News: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस हा कमी पडल्याने शेतकरी हवालदार झाले आहेत. पाऊस हा भरपूर प्रमाणावर पडला नाही. यामुळे, शेतकऱ्यांनी डबल पीक हे काढलेले नाही. त्यामुळे अगोदरचे पीक म्हणजेच कापूस व सोयाबीन हे पिक शेतकऱ्याने भाव वाढेल, या आशेने जपून ठेवले होते. पण या पिकाचे भाव न वाढता खते व औषधांचेच भाव वाढत चालले. यामुळे या शेतकऱ्यांच्या मालाकडे कोणीच लक्ष का देत नाही ? असे दिसून येते. या महागाईच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमालाकडे लक्ष द्यावे, असे शेतकऱ्यांनी यामध्ये स्पष्ट म्हटले आहे.
महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, वसमत या तालुक्यांमध्ये हमीभाव खरेदी केंद्र हे या ठिकाणी असावे. पण, या हमीभाव खरेदी केंद्राची मागणी अजून कुठल्याही ठिकाणी करण्यात आलेली नाही. अशा काही गोष्टींकडे लक्ष देण्यास कोणीच का समोर येत नाहीत ? यामुळे, त्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा विकला जात आहे.
त्यामध्ये दुसरीकडेच या शेतमालाचे खते व औषधांचे भाव हे रोजच वाढताना आपल्याला दिसत आहेत. यामुळे लागवडीचा खर्च हा जास्त प्रमाणात होत आहे. याच्यामध्ये शेतीमालाचे भाव हे का वाढत नाहीत ? असा प्रश्न शेतकऱ्यांतून निर्माण होत आहे.
त्याचप्रमाणे वसमत तालुक्यातील गेल्या वर्षी सर्वाधिक हा पेरा सोयाबीन या पिकाचा झालेला होता. व कापसाचाही पेरा हा जास्तीचाच झालेला होता. आणि या वर्षी जून महिन्यामध्ये पावसाने या लहरीपणाचा फटका सुरू केलेला होता. जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये पावसाची अतिवृष्टी निर्माण झाली होती. व सोयाबीन आणि कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपल्याला दिसून आले होते. त्यातच, या पिकांवर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला होता, व पिकांच्या उत्पादनामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात घट झालेली दिसून आली.
हे पण वाचा :- राज्यात मराठा समाजाच्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र कोणत्या विभागात किती नोंदी? पहा संपूर्ण सविस्तर माहिती
Agriculture News
सोयाबीन व कापूस या दोन्ही पिकाचे भाव वाढणार झाले, त्यातच बियाणे, रासायनिक खते, कीटनाशके, तणनाशके, आदींसह उत्पादन खर्चामध्ये कितीतरी पट वाढ होत आहे. दोनवर्षापासून हा अपवाद वगळता शेतकऱ्यांना या सोयाबीन पिकांमधून हातात काहीच पडत नाही. आता या सोयाबीन पिकाला बाजार समितीमध्ये 4450 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा हा भाव भेटत आहे. तर कापूस या पिकाचा भाव 7 हजारांच्या पुढे सरकत सुद्धा नाही.
गेल्या वर्षी कापूस या पिकाचा भाव 9000 च्या पुढे गेला होता. पण, त्यामानाने आता यावर्षी या पिकाला भाव सुद्धा चांगल्या प्रकारचा भेटलेला नाही. शेतकरी यामुळे फारच हवालदिल झालेले दिसून येत आहे. यामुळे, व्यथा ही सांगावी कोणाला तेच कळत नाही ?
शेतकऱ्यांनी म्हटले आहे, की आता शेती करणं हे फारच अवघड होऊन बसलं आहे. आता शेती करण्यासाठी वातावरण नाही साथ देत नाही, व यामध्ये मजुराची मजुरी देखील फार वाढलेली आहे. अशा वेळी या शेतीमालाला भाव हा भेटणं फारच आवश्यक आहे. अशा काळात भाव हा शेतीमालाला न भेटल्याने शेती करणं हे फार अवघड होईल.
आपल्याला दोन पैसे मिळावे म्हणून, शेतकरी हा रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये खूप अशी मेहनत करुन पिक जोपासत असतो. आणि शेतमालाला भाव पाहिजे तसा भेटत नाही, यामुळे शेती नाही केलेली बरी. असं म्हणण्याची वेळ आता ही शेतकऱ्यांवर आलेली आहे. कारण, शेतीमालाला हा भाव कसल्याच प्रकारे भेटत नाही, त्यामुळे शेतकरी हे शेती करण्यासाठी वैतागून गेलेले आहेत.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पिक विमा नाही दिला तर कंपनी विरोधात एफआयआर दाखल करतो —कृषिमंत्री धनंजय मुंडे