Agriculture Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण तूर, कापूस, सोयाबीन, कांदा आणि हिरवी मिरची या शेती पिकांचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. कोणत्या बाजार समितीत या शेती पिकांना सर्वात जास्त बाजारभाव मिळतोय याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
- सोयाबीन
ब्राझीलमध्ये पूर आल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते त्यामुळे गेल्या आठवड्यात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात तेजी पाहायला मिळाली होती. पण आज दुपारपर्यंत गावात काहीशी नरमाई आली आहे. सोयाबीनचे वायदे 12.9 डॉलर प्रति बुशेलस्वर पोचले होते. तर सोयाबीनचे दर 369 डॉलरवर होते.
देशातही आज सोयाबीन खरेदी भाव 4800 रुपये प्रति क्विंटल होते. तर बाजार समितीमधील भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान पोहोचली आहे. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस अशीच राहू शकते असा बाजार अभ्यासक यांचा अंदाज आहे.
- कापूस
कापसाच्या बाजारभावातील चढउतार चालूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे कैसे कमी होऊन 77.79 शेठ प्रतिपादवर बंद झाले होते. तर देशातील बाजारात कापसाचा भाव कायम आहे. देशातील बाजारात कापसाच्या व मागील काही दिवसापासून एका पातळी दरम्यान होत आहे.
देशातील बाजार समितीमध्ये कापसाला 7200 ते 7600 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळत आहे. कापसाचे भाव आताच आणखीन काही दिवस चढउतार पाहायला मिळेल. असा अंदाज कापूस बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे. Agriculture Market Price
- कांदा
केंद्र सरकारने कांद्या निर्यात बंदी उठवल्यापासून कांद्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळाली आहे. कांद्याला बाजारात आजही 1700 ते 2000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांदा बाजार तिला व काही प्रमाणात वाढण्याचे व्यापारी सांगत आहेत.
कांद्याचे भाव सुधारण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर लावलेले 550 डॉलर प्रति टन किमान निर्यात मूल्य आणि त्यावर 40 टक्के निर्यात शुल्क काढावे अशी मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत. मात्र सरकार त्यांच्या निर्णयावर कायम आहे. कांद्याचे भाव येणाऱ्या दिवसात आणखीन वाढतील असे कांदा बाजार अभ्यासक यांचे म्हणणे आहे.
- तूर
तुरीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आहे. वाढती मागणी आणि घटलेली आवक याचा दरावर मोठा परिणाम होत आहे. देशातील महत्त्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी 11000 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान भाव मिळत आहे.
तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली आहे. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारात अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.
- हिरवी मिरची
बाजारात सध्या हिरव्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी आणि मागणी मात्र चांगली असल्यामुळे हिरव्या मिरचीचे दर चांगलेच वाढले आहेत. त्यातच लग्नसराई आणि सणामुळे हिरव्या मिरचीला चांगली मागणी मिळत आहे. यामुळे हिरव्या मिरचीचे भाव सध्या तेजीत आहेत.
सध्या हिरव्या मिरचीला चार हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तसेच वाढत्या उन्हामुळे मिरची पिकाच्या उत्पादनात फटका बसला आहे. त्यामुळे पुढच्या काळात मिरचीची आवक आणखीन कमी होईल, आणि मिरचीचे दर आणखीन वाढतील असा अंदाज मिरची बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.