Agriculture Market News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापसाच्या बाजार भाव चढउतार कायम दिसत आहे. मागील काही दिवसापासून कापूस भाव दबावाखालीच आहेत. आज 71.79 सेंट वर होते देशातील वायदेही छप्पन हजार रुपयांपर्यंत कमी झाले होते. बाजार समितीमध्ये भाव पातळी सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये दरम्यान खेळत आहे. बाजारातील कापसाची आवकही टिकून आहे. कापुस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ती स्थिती आणखीन काही दिवसात होऊ शकते असा अंदाज कापुस बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.
दररोज शेतीमालाच्या सर्व पिकाच्या बाजार भावा बदल माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे बाजारभावात कालच्या तुलनेत आज कमी आली आहे. सोयाबीनचे आज दुपारी 11.74 डॉलर प्रतिबुषेल्सावर होते. तर सोयापेंडचे वायदे 361 डॉलर प्रति टन होते. देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र आहे तेवढीच आहे. बाजार समिती मधील भाव 4000 100 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान होते. ही स्थिती आणखीन काही दिवस अशीच राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे. Agriculture Market News
18 जून ला 17व्या हप्त्याचे 2000 रुपयांऐवजी, 4000 रुपये खात्यात जमा होणार!
कांद्याच्या भावात आज काही ठिकाणी प्रतिक्विंटल सरासरी शंभर ते दोनशे रुपयांची वाढ दिसून आली असून कालच्या भावात आणि आजच्या बाजार भावा तुलना केली तर आजच्या बाजारभावात सुधारणा झालेली दिसत आहे. आज कांद्याचा सरासरी भाव 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्याने कांद्याचे आवक कमी झाली असून तसेच दरात चांगली सुधारणा झाल्यानंतर बाजारात आवक वाढेल अशी अपेक्षा आहे. या पुढच्या काळातही कांदा अवस्थेनुसार बाजारात बदल होऊ शकतात असा अंदाज कांदा बाजार अभ्यास यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 18 जून पर्यंत या शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ? सरकारचा मोठा निर्णय
सध्या तुरीचे भावी 12 हजाराच्या दरम्यान असल्याने देशातील तूर बाजारात चांगला आधार मिळत आहे. म्यानमार आणि आफ्रिकेतील देशांमधून काही प्रमाणात तूर आयात होत आहे. देशातील बाजारातही पुरवठा कमी असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी यादरम्यान तुर विकली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात तुरीचा साठा उपलब्ध आहे सध्या तुरीला सरासरी अकरा हजार ते अकरा हजार 700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील तेजी असेच राहील असा अंदाज बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात आज बरसणार अतिमुसळधार पाऊस! पुढील 12 तासासाठी IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
मक्याच्या बाजारात मागील दोन महिन्यापासून एक भाव पातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मकाला चांगली मागणी आहे. पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भाव पातळी टिकून आहे. मक्याला दोन हजार शंभर ते 2400 रुपये दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखीन काही दिवस अशीच राहू शकते असा बाजार अभ्यासक यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
1 thought on “पहा आजचे तुर, कापूस, सोयाबीन, कांदा आणि मकाचे बाजार भाव!”