Agriculture compensation announced: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मालेगाव तालुक्यासह राज्यभर सर्वत्र पावसाने दांडी मारलेली आहे. राज्यभरामध्ये 40% पेक्षा कमी पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत शासनाने नुकतीच जाहिर करून ट्रिगर – टू लागू करीत राज्यातील स्त्रीचेस तालुक्यामध्ये दुष्काळ ठरवला गेला आहे यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 8,500 ते 22,500 हजार रुपये नुकसान भरपाई मिळू शकते.
राज्यामध्ये यंदा पावसाळा सरासरीपेक्षा कमी झालेला आहे तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड पडल्याने पाणी पातळी घट झाली आहे अपेक्षित उत्पन्नात 50% पेक्षा अधिक घट पिकांचे नुकसान साऱ्यांचा प्रश्न गंभीर पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळ ट्रिगर -2 लागू करण्यात आला आहे.
याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाटण्यात आलेला असून दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई रक्कम जमा करणे देऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये सरकारतर्फे गिफ्ट मिळू शकते. कमी प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचे पिके करपून नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी महसूल मंडळाकडे पिकांचे पंचनामे करण्यात आलेले होते पंचनामे केल्याचा अहवालनुसार लवकरात शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25% रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
या पिकांचे मिळणार नुकसान भरपाई
- मका,कापूस, बाजरी, ज्वारी, मुग, भुईमूग, कांदा या पिकांना नुकसान भरपाई मिळू शकते .
अशी मिळेल प्रती हेक्टर नुकसान भरपाई
- पिक रूपये ( प्रतीहेक्टर)
- कापूस – ४९,५००
- भुईमूग – ४२९७१
- मका – ३५,५९८
- कांदा ८१.४२२
- बाजरी ज्वारी ३०,०००
- मूग 20.000