Agricultural compensation | शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या आर्थिक नुकसान होत असते. मध्यंतरी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे. व हीच नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निधी वितरणास मान्यता दिली आहे.
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी व 2024 या कालावधीमध्ये झालेल्या शेतक-यांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 24 कोटी 68 लाख 37 हजार रुपये मदत निधी वितरण करण्यास राज्य शासनाच्या माध्यमातून मान्यता दिली आहे.
याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून या निर्णयामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व दिल्यास देण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
डिसेंबरच्या शेवटी 2023 व जनवरी 2024 या कालावधीमध्ये झालेल्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मदत निधी प्राप्त प्रस्ताव नुसार राज्य शासनाने ही मदत वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे. असे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शतकांचे झालेले अतोनात नुकसान राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहते.
अवकाळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शतकांच्या नुकसान भरपाई करिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.