Advance crop insurance approved : दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगामात महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत, या 24 जिल्ह्यातील सुमारे 52 लाख शेतकऱ्यांसाठी 2,216 कोटी रुपयांची आगाऊ पिक विमा देत मंजूर करण्यात आले आहेत. ही रक्कम विमा दाव्यांच्या 25% इतकी आहे.
त्यापैकी 1,690 कोटी रुपयांपर्यंत वितरित करण्यात आले आहेत. सुमारे 634 कोटी रुपयांचा निधी जलद गतीने वितरित करण्यात येत असल्याची, माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
25% आगाव पेमेंट साठी अधिसूचना, जिल्हा प्रशासनाकडून प्रारंभिक पीक नुकसान मूल्यांकनाच्या आधारे जारी करण्यात आले आहेत. या विरोधात काही विमा कंपन्यांनी जिल्हा व विभागीय स्तरावर अपील केले होते. मात्र त्यांचे अपील फेटाळण्यात आले होते.
Advance crop insurance approved
त्यानंतर, काही कंपन्यांनी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीशी संपर्क साधला. राज्य सरकारने हवामान तज्ञ आणि कृषी विद्यापीठाच्या तजनांच्या मदतीने 21 दिवसांच्या पावसाच्या खंडानुसार पीक नुकसानीचे पुरावे आणि विमा कंपन्यांना दाव्यांची भरपाई करण्यासाठी तांत्रिक तपशील प्रदान केले.
काही विमा कंपन्यांचे अपील अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत. अपील निकाल लागल्यानंतर मंजूर विमा दाव्यांची रक्कम आणखी वाढेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
विम्याचा दावा म्हणून 1,000 रुपयांपेक्षा कमी मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी किमान रुपये 1,000 असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येत आहे. असे, धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र सरकारने खरीप हंगामातील दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पिक विम्याची देयक सुनिश्चित केली आहे.
हे पण पहा:-लेक लाडकी योजना, या योजनेंतर्गत सरकार मुलींना 75000 रुपये देत आहे, अशा करा ऑनलाइन अर्ज
अश्याच नवनविन महिती साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइन करा