Beautiful village : मित्रांनो तुम्हाला माहिती आहे? का महाराष्ट्रातील एक असं गाव की त्या गावांमध्ये सूर्योदय दोन ते अडीच तास उशिरा होतो. आणि नंतर सूर्यास्त दोन ते अडीच तास लवकर होतो. या गावातील दिवस फक्त 6 ते 7 तासांचा म्हटलं तरी ठीक आहे. सह्याद्री डोंगराच्या रांगेत हे गाव बसलेला आहे. ह्या गावाचे नाव कोणत्या असेल, बरं व या गावांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर हे आपण जाणून घेऊया.
सह्याद्रीच्या उंच उंच अशा डोंगर रांगेत हे गाव आहे. आणि या गावाचे नाव ‘फोफसंडी’ हे आहे.या गावाच्या नावाची एक रंजक गोष्ट आहे. आपल्या देशात ब्रिटीशांची राजवट होती. तेव्हा फाॅफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी या निसर्गरम्य परिसरात म्हणजेच, या फोफसंडी गावात विश्रांतीसाठी जात असायचा. तेव्हा पासुनच या गावाचे नाव ‘फोफसंडी’ हे पडलें.
हा इंग्रज तेथील गावातील राजवटीतील अध्यक्षपदाचा होता. व त्या इंग्रजांचा तेथील राजवटीमध्ये दरारा होता. या कारणे तेथील सर्व रहिवासी त्या इंग्रजाचा मान राखायचे. या कारणाने फोप संधी हे गाव मोठ्या चर्चेत आलेले आहे.