Chilli India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. शेतीसाठी नवीन हंगाम सुरू व्हायला फक्त एक महिना उरला असताना शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू झाली आहे. याचाच फायदा घेत मिरचीचे दहा ग्रॅम बियाणाचे पाकीट 550 ते 800 रुपयापर्यंत बाजारात विकले जात आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेचा कोणताही अंकुश नसल्याचे या प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खरीप हंगामाला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरवर्षी रोहिणी नक्षत्राला 25 जूनला सुरुवात होत असते. त्यासाठी शेतकऱ्यांना मिरची बियाणाची पेरणी एक महिना अगोदर करून जुलै महिन्यापर्यंत रोपे तयार करावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना आत्ताच शेत जमीन तयार करून बियाणे व खते खरेदी करून ठेवणे गरजेचे असते.
वाफ्यात शेणाच्या गवऱ्या जळून खत तयार करून त्यात पाणी सोडावे लागते मग मिरचीचे बियाणे पेरून रोपे तयार करावे लागतात. एवढी सर्व मेहनत करून उत्पादित हिरव्या मिरचीला दोन ते पाच हजार रुपये प्रति 100 किलोला दर मिळत असतो. म्हणजे आजची दहा ग्रॅम बियाण्याची किंमत शेतकऱ्यांना शंभर किलो मिरची विकल्यानंतरही मिळत नाही. मात्र कधीतरी चांगला भाव मिळेल आणि भरपाई होईल अशा आशेवर शेतकरी दरवर्षी हिरव्या मिरचीची मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात.
सध्या बाजारात हिरव्या मिरचीचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी जात आहेत. पण कृषी केंद्रात बियाणाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेती चांगली होण्यासाठी शेतकरी कर्ज काढून तसेच घरातील सोने गहाण ठेवून महागडे बियाणे मजबुरीने खरेदी करत असतो. मात्र त्याच्या मालाला योग्य बाजार भाव मिळत नाही ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. Chilli India.