Rain Alert | राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यावर काही पावसाचे सावट कायम असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पुन्हा एकदा मराठवाड्या व विदर्भामध्ये सलग पाच दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज वर्तनात आलेला आहे.
तसेच मागच्या काही दिवसांचा विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्ये अवकाळी पावसाने दुमाशन घातला आहे. आजी पावसाची शक्यता कायम असणार आहे. राज्यावर काही ठिकाणी पावसाचे ढग कायम असून जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या आहे.
पिक विमा योजनेत मोठा बदल..! या शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के नुकसान भरपाई
या भागात पावसाची शक्यता कायम
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम असून पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यामध्ये तुरळ ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे. तर पुढील 24 तासांमध्ये सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात पावसाची शक्यता कायम असणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार विदर्भाच्या काही जिल्हामध्ये वादळी वाऱ्यास विजांच्या कडकडाटासह दुसऱ्याचा वारा आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .भारतीय हवामान खात्याने 16 एप्रिल आणि 17 एप्रिल सोलापूर उस्मानाबाद सांगली या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे. मुंबईमध्ये मात्र हवामान विभागाने वातावरण कायम राहणार असून काही भागांमध्ये तापमान वाढीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
त्याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलेली आहे. कारण सध्या ज्वारी गहू हरभरा या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे. त्यातच अवकाळी पावसाने धमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे.
मध्यंतरी दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढू लागलेली आहे. व हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या इशारा देखील देण्यात आलेला आहे.