Kisan Credit Card Apply: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला भारत देश हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे भारतातील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना विविध फायदे मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले आहे. परंतु या कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडून बरेच अडथळे निर्माण व्हायचे. यावर सरकारकडून नवीन कल्पना काढण्यात आली आहे. आता होणारे अडथळे कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यामध्ये एक अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे. ॲग्री स्टॉक या आजच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज मंजूर होणार आहे. या कर्जाचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे. हा प्रयोग महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये प्रयोगिक तत्त्वावर हा प्रकल्प या मे पासून राबविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षापासून ईपीक पाहणी अर्थात पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी एक ॲप विकसित करण्यात आले आहे. याच ॲपच्या पद्धतीवर केंद्राकडून संपूर्ण देशासाठी एकाच ॲप मधून पिकाची नोंदणी करण्याचे ठरवले गेले आहे.
आगामी खरीप हंगामापासून देशभरात एकच ॲप वर पिकाची नोंदणी केली जात आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची बिनचूक नोंद होणार असल्याचे सांगीतले जात आहे.
प्रक्रिया कशी असेल? | Kisan Credit Card Apply
ॲप डाऊनलोड केल्यानंतर आणि आधार कार्ड टाकल्यावर ओटीपीतून पडताळणी होईल. फेस आयडी च्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटवण्यात येईल. शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकेच्या कर्जाची ऑफर दिसेल. त्या ऑफर्स मधून एक वापर स्वीकारून दहा मिनिटात प्रक्रिया करून अर्ज जमा होईल. किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून एक लाख साठ हजार पर्यंतचे कर्जाला कोणतेही तारण लागणार नाही.
हे पण वाचा:- लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण..! पहा आजचा लाल मिरचीचा बाजार भाव
2 thoughts on “किसान क्रेडिट कार्डवर मिळणार लाखो रुपयांचे बिनव्याजी कर्ज, पहा सविस्तर माहिती”