Government Scheme For Cow Farming: नमस्कार शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दूध अनुदान योजना शेतकऱ्यांच्या खात्या येणारे योजनेचे पैसे पहिल्या टप्प्यात 11 जानेवारी ते 20 जानेवारी या दहा दिवसातील दुधाचे प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे.
दूध अनुदान योजनेची घोषणा करून बरेच दिवस झालेले आहेत आणि अखेर आता पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. तुझा अनुदानाचे प्रति लिटर पाच रुपये याप्रमाण पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी व मल्टीस्टेट दूध संघाकडून 91 हजार 600 दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावराच्या कानामध्ये बिल्ला ठोकून घेतला आहे त्या प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या गाईच्या दुधाच्या प्रति लिटर मागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी 81 हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. Government Scheme For Cow Farming
यामध्ये प्रामुख्याने तीन टप्पे पडतात पहिल्यांदा शेतकऱ्याची माहिती भरून घेतली जाते. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये कागदपत्र अपलोड केले जातात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते. आणि पुढील काही दिवसात शेतकऱ्याच्या खात्यामध्ये उर्वरित पैसे जमा करण्यासाठी दूध विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदा राज्यात गाय दूध उत्पादक वाढलेले असून दर मात्र फार कमी असल्यामुळे यंदा राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असूनही दुधाला सरासरी 22 ते 28 रुपये प्रति लिटर दर मिळत आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शासनाने दूध अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याला प्रति लिटर पाच रुपये दूध अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदानित ठरवून घेण्यात आले आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. परंतु पैसे खात्यावरती आल्याशिवाय शेतकऱ्यांना खात्री पटत नाही. अनुदान 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या एका महिन्यासाठी दिले जाणार आहे. परंतु या अनुदानासाठी शासनाने मोठ्या अटी घातलेले आहेत.
दहा दिवसाचे शेतकऱ्याच्या दुधाच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी काही अटी होत्या त्यानुसार दहा दिवसाची माहिती दूध संस्थांना भरण्यास सांगितली होती. दूध संस्थेने आपले काम सुरू केले आहे जिल्ह्यातील सरकारी व खाजगी दूध संघाकडे काय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संख्या सुमारे अकरा हजार सहाशे आहेत.
काय दूध संघाने शेतकऱ्याची माहिती अपलोड केलेले आहे त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे पहिल्या टप्प्यात दूध उत्पादकांना त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. ॲपद्वारे माहिती भरलेल्या विकासाची चाळणी लावूनच येते त्यानंतर दूध विभाग फक्त कॅशलेस व्यवहाराची तपासणी करून अनुदानाची प्रस्ताव ठरविणार आहे. शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 11 जानेवारी चे 20 जानेवारी दरम्यानची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
हे पण वाचा:- या सत्तावीस हजार रेशनकार्ड धारक कुटुंबासाठी गुड न्यूज, पहा काय मिळणार नवीन फायदे?
1 thought on “दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दूध अनुदान जमा? दहा दिवसाचे पैसे मिळणार”