Maharashtra Rain Alert | राज्यामध्ये ऊन पाऊस आणि गारवा खेळ पाहायला मिळत आहे. तसं जर मागच्या वर्षी आणि यावर्षी राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळाला आहे. कधी पाऊस कधी ऊन तर कधी गारपीट यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हतबल झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच राज्यात देखील आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच मराठवाडा आणि इतर परिसरावर चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहे. त्यामुळे पूर्व मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी मराठवाड्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भामधील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातील हवामानामध्ये मोठा बदल
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पूर्व मध्य प्रदेश तेलंगाना आणि छत्तीसगडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलके ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेश मध्ये जोरदार वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 26 फेब्रुवारीला छत्तीसगड मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता वर्तनात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेत पिकाची विशेष काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात आले आहे.