Thursday

13-03-2025 Vol 19

कोणत्या रेशन कार्डधारकाला किती राशन मिळेल? व कोणत्या राशनकार्डावर राशन मिळत नाही? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Food Supply Department: नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला माहीतच असेल की रेशन आपल्यासाठी अन्य धान्याचा साधन आहे. व या रेशन कार्ड मधून आपल्याला सरकार हे मोफत अन्य देत असते, जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तर मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूप खास असणार आहे. महाराष्ट्रात रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार हे आपल्याला पाहायला मिळतात व वेगवेगळे रंगाचे देखील यामध्ये रेशन कार्ड हे असतात.

तर यामध्ये काही लोकांकडे पिवळ्या कलरचे रेशन कार्ड आहेत. व काही लोकांकडे केसरी कलरचे रेशन कार्ड आहेत तर काही लोकांकडे पांढरे कलरचे सुद्धा रेशन कार्ड आहेत, याच दरम्यान रंगानुसार रेशन कार्ड वर दिल्या जाणाऱ्या धान्यामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतो. सध्या स्थितीला रेशन कार्डचे शासनाने यामध्ये 4 प्रकार तयार केलेले आहेत.

अंत्योदय रेशन म्हणजे पिवळ्या कलरचे, प्राधान्य कुटुंब अर्थातच केसरी, अबव्ह पाॅव्हर्टी लाईन कुटुंबासाठी म्हणजेच, दारिद्र्यरेषेपेक्षा अधिक प्रकारचे उत्पन्न असलेल्या कुटुंबांना एपीएल आणि पांढरे असे 4 यामध्ये प्रकार पडतात. जर तुमच्याकडे असलेल्या रेशन कार्ड यावरून तुम्हाला धान्य मिळणार आहे, की नाही ते ठरत असते.

अशा परिस्थितीमध्ये आता आपण कोणत्या रेशन कार्ड धारकाला किती धान्य हे मिळते. व कोणते असे रेशन कार्डधारक आहेत. की ज्यांना या धान्याचा लाभ मिळत नाही. याविषयीची सविस्तर माहिती ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तर कोणत्या रेशन कार्ड धारकाला धान्य भेटत नाही ?

पांढरे शुभ्र व एपीएल अशा रेशन कार्डधारकांना हे धान्य भेटत नाही. व आर्थिक दृष्ट्या सक्षम लोकांना हे पांढरे कार्ड दिले जात असतात. त्यामुळे या लोकांना अनुदानाच्या धान्याची गरज नसते म्हणून त्यांना धान्य हे भेटत नाही.

आणि यामध्ये हे असे लोकांना लागू होते, की ज्याचे उत्पन्न ग्रामीण भागात 44 हजार रुपये पेक्षा जास्त व शहरी भागामध्ये 59 हजार रुपये पेक्षा जास्त व एक लाख रुपयांपेक्षा कमी असते.

असे रेशनकार्ड ज्यांच्याकडे असते ते दारिद्र्यरेषेपेक्षा वर असतात. म्हणजे, Above poverty line असतात. यामुळे त्यांना हे धान्य भेटत नाही. Food Supply Department

तर किती धान्य कोणाला भेटते ?

जे पिवळे रेशनकार्ड धारक आहेत म्हणजेच, अंत्योदय रेशनकार्ड अशा लोकांना जारी केले जाते. की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. याशिवाय घरामध्ये दिव्यांग व विधवा व्यक्ती असेल, तरीसुद्धा हे रेशनकार्ड जारी केले जाते.

अशा रेशनकार्ड धारकांना प्रति कुटुंब 35 किलो धान्य भेटते. व यामध्ये 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ, आणि तसेच 20 रुपये प्रति किलो या भावाने 1 किलो साखर देखील भेटते.

यामध्ये ज्या लोकांचे ग्रामीण भागांमध्ये 44 हजार रुपयांपेक्षा कमी व शहरी भागामध्ये 59 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असते. अशा लोकांना केशरी रेशन कार्ड दिले जातात. या कार्डधारकांना प्रती व्यक्ती 2 किलो एवढे गहु व 3 किलो एवढे तांदुळ मिळतो.

हे पण वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 115 कोटी रुपये जमा, तुमचे पैसे आले की नाही येथे तपासा?

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *