Budget 2024 | बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर होणार आहे. यामध्ये बेरोजगार तरुणांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये बेरोजगार तरुणांसाठी खास निर्णय होणार असे तज्ञांनी व्यक्त केले आहे. देशभरामध्ये लवकरच सार्वत्रिक लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणारा अर्थसंकल्पनात अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार असे सांगितले जात आहे.
केंद्र सरकार देशातील रोजगार वाढवण्यासाठी अनेक योजना राबवणार आहे त्यापैकी आत्मनिर्भर भारत हि एक योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार रोजगार निर्मितीसाठी काम करते.
सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकार अर्थनिर्भर भारत रोजगार योजनेची व्याप्ती वाढवू शकते. सरकार देशभरातील बेरोजगार तरुणांसाठी नोकऱ्या देण्याचे काम करू शकते. यासाठी कंपन्यांना भविष्य निर्वाह निधीवर सबसिडी प्रोत्साहन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मीडिया रिपोर्टवर मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च 2024 नंतर या योजनेची मुदत वाढ होणार आहे. कोविड 19 च्या काळात डिसेंबर 2020 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत बावीस हजार आठशे दहा कोटी रुपयांची निम्मेहून अधिक रक्कम खर्च झाली नाही आणि ती या मार्चमध्ये संपणार होती.
अनेक उद्योग ना ही सरकारला या योजनेचा विस्तार करण्याची विनंती केली आहे. या योजनेअंतर्गत नोकऱ्या निर्माण करण्यात मदत होणार आहे. तसेच ज्यांना कोरोना काळात नोकऱ्या गमावल्या होत्या त्यांना पुन्हा नोकरी मिळण्यास मदत झाली आहे. असे एका उद्योग प्रतिनिधीने सांगितले आहे.
या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांची नोकरीचे संपणार आहे. परंतु येतात अर्थसंकल्पानाकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे. अर्थसंकल्पनामध्ये कोणते निर्णय होणार आणि नागरिकांना याचा फायदा होणार का हे पाहण्यासारखे राहणार आहे.