24k gold price in India | लग्न सरा सुरू झाला असताना नागरिकांसाठी आनंदाची बातमी येत आहे. सोने खरेदी करण्याची संधी सोडू नका मित्रांनो सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीतील घसरण ग्राहकांना आनंद देत आहे.
जानेवारीमध्ये चक्क 2150 रुपयांनी सोने तर चांदी चार हजार चारशे रुपयांनी स्वस्त झाली आहे. तरी या महिन्याभरामध्ये सहा ते सात दिवस सोने चांदी भाव वधारला होता. लग्न सरा सुरू झाला आहे या महिन्यामध्ये लग्नानिमित्त व सणानिमित्त नागरिक सोने खरेदी करतात. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी असू शकते. तर जाणून घ्या किती रुपयांनी सोने झाले आहे स्वस्त.
सोन्याचा दर किती
जानेवारी महिन्यामध्ये नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सोने खरेदी करण्यासाठी त्यांचे बजेट बिघडणार नाही. प्रत्येक आठवड्यामध्ये सोन्यामध्ये घसरण झाली आहे. तर काही दिवस सोन्याच्या किमती स्थिर होत्या. या महिन्यामध्ये सोने 2150 रुपयांनी उतरलेले आहे. गेल्या आठवड्यामध्ये शुक्रवारी 19 जानेवारी रोजी 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. तर 20 जानेवारी रोजी शंभर रुपयाची वाढ झाली होती.
तर सोमवार पासून किमतीमध्ये मोठा बदल झाला नाही. 24 जानेवारी रोजी सोन्याच्या दारामध्ये पन्नास रुपयांनी घसरण झाली. गुड रिटर्न्स या दिलेल्या वेबसाईट नुसार 22 कॅरेट सोने 57 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आहे.
चांदीचा दर किती
गुड रिटर्न्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार चांदीने ग्राहकांची चांदी चांदी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चांदीमध्ये तीन हजार शंभर रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर मध्यंतरी चांदी चौदाशे रुपयांनी महागली व 19 जानेवारी रोजी चांदी दोनशे रुपयांनी वधारली.
व त्यानंतर 20 जानेवारी रोजी तितकीच घसरण झाली व त्यानंतर चांदीचे भाव जैसे ते वैसे झाले. 23 जानेवारी रोजी चांदीच्या किमतीमध्ये पाचशे रुपयांची घसरण झाली. तर 24 जानेवारी रोजी पुन्हा चांदीच्या किंमतीमध्ये तीनशे रुपयांची वाढ झाली. एक किलो चांदीचा भाव 75 हजार 300 रुपये आहे.
2 thoughts on “सोन्याच्या भावात मोठी घसरण, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका”