Onion Market: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा राज्यातील शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. म्हणजे नेहमीच बदललेल्या निसर्गामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
अशातच शेतकऱ्यांनी काहीतरी दिलासा द्यावा यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कांदा भुकटी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमित बदललेल्या निसर्गातील वातावरणामुळे राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन अशा पिकावर मोठ्या परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे त्या पिकाला योग्य तो हमीभाव देखील मिळत नाही.
यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल देखील बदलत्या नैसर्गिक आपत्तीमुळे चांगल्या परमाणात झाले आहे. शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेण्यासाठी जो खर्च केलेला आहे तो खर्च देखील निघत नाही. अशा परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्यामार्फत नवीन घोषणा करण्यात आली आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या घोषणे मार्फत असे जाहीर करण्यात आले की स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कांदा भुकटी करण्याचा प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
हे पण वाचा: कर्जमाफी बाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद केल्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत होती. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी चिंतेत होता. कांदा उत्पादनात झालेला खर्च देखील निघत नव्हता. शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी हा चांगला निर्णय घेतला आहे. Onion Market
कांदा भुकटीचा हा प्रकल्प पारदर्शी प्रकल्प स्मार्ट योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी 60 टक्के एवजी 90 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी असा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे.
सध्या कांद्याला भाव नसल्याने कांद्याची बुकटी करून येणाऱ्या काळात ज्यावेळेस भाव असेल त्यावेळेस विक्री करून शेतकऱ्यांच्या पदरात योग्य तो दर दिला जाईल असे या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. हा प्रकल्प राज्यासह संपूर्ण देशभरात देखील राबवण्यात येणार आहे. जसे जसे याचे काम वाढत जाईल तसे तसे हा प्रकल्प इतर जिल्ह्यांमध्ये देखील विभागला जाईल.
नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेती पिकाचे नुकसान होत होते व त्यातूनही शेती पिकांना योग्य तो दर दिला जात नव्हता. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना कोणता ना कोणता मार्ग देणे अतिशय गरजेचे होते. यासाठी हा प्रकल्पाची उभारणी केलेली असेल असे जाणकारांनी व्यक्त केले आहे.
या प्रकल्पाची मागणी जयंतराव जाधव माजी विधान परिषद सदस्य यांनी केली होती त्यांच्या मागणीच्या मार्फत मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडलेला हा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यायापीक हित्व निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेता कांद्याची भुकटी करण्याचा पथदर्शी प्रकल्प लवकरच सुरू होईल.
हे पण वाचा: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! कांद्याच्या भावात झाला मोठा बदल, पहा आजचा बाजार भाव