Thursday

13-03-2025 Vol 19

‘या’ तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Market | नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल, की सर्व राज्यभरातील शेतकरी हे कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहे. कांदा हे पीक असा आहे की, जे काढल्यानंतर ज्या कांदा चाळीमध्ये ठेवले जाते. तिथे हवा न लागण्याने कांदा हा मोठ्या प्रमाणात सढला जातो. यामुळे सरकारने एक तंत्रज्ञान सुरू केल आहे. त्याबद्दलची माहिती आपण पाहूया.

आर्टिफिशियल इंटेलिजेस अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर आता जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शेती क्षेत्र ही त्यापासून वेगळे नाही. तंत्रज्ञानाचा वापर देशभरातील होणारी कांद्याची नासाडी ही थांबवली जाणार आहे. देशामध्ये रब्बी व हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या जवळपास एक चतुर्थांश कांद्याची ही नासाडी होत जाते. त्याच प्रमाणावर देशामध्ये जवळपास 11000 कोटींचा कांदा हा सडून खराब होत आहे. यामुळे, कांद्याची सडघाण ही थांबवण्यासाठी आता सरकारकडून आरटीफिशियल इंटेलिजेस या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.

कांद्याची स्थिती काय समजणार ?

आर्टिफिशियल इंटेलिजेस या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हा सेन्सर च्या सहाय्याने कांद्याची सडण्याची व खराब होण्याची आकडेवारी मिळु शकणार आहे. येवढेच नाही तर, या मध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने साठवून ठेवलेला कोणत्याही प्रकारचा कांदा हा खराब होतोय. तर, मग हा कोणता कांदा हा उत्तम अशा स्थितीमध्ये आहे. हे पण ,समजू शकणार आहे. कांद्याची साठवणूक करून ठेवलेला कांदा हा खराब होऊन तो तात्काळ प्रतिबंध घातला जाऊ शकतो. कारण अशा वेळीच सडलेला कांदा हा साठवणूक असलेल्या जागेतून बाजूला केल्यास अशा प्रकारच्या अन्य कांद्यांची नासाडी ही होण्यापासून रोखली जाऊ शकते.

पाहुया सरकारचा पायलट प्रोजेक्ट कसा असणार ते.

शेतकऱ्यांच्या कांद्याची फारच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यासाठी, केंद्र सरकारकडून एक पायलट प्रोजेक्ट हा उभारला जाणार आहे. त्या माध्यमातून देशातील शंभर आरटीफिशियल इंटेलिजेस तंत्रज्ञानवर आधारित कांदा साठवणूक केंद्र ही उभारले जात आहे. या केंद्रांच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कांदा साठवणूक केंद्रांची संख्या 500 हून अधिक वाढली जाणार आहे. या केंद्रासाठी सरकारकडून किती निधी हा आकारला जाऊ शकतो. अशी माहिती सध्या तरी समोर आलेली नाही.

साठवणुकीचा कालावधी हा कधी वाढवणार आहे ?

या प्रकारच्या खरीब हंगामातील कांदा हा नाहीतरी साठवणूक करूनच ठेवण्याच्या लायक नसतो. कारण, रब्बी आणि उन्हाळी या हंगामातील कांद्याची देशात मोठ्या प्रमाणामध्ये साठवणूक केली जाते. मात्र, आता यात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कांद्याचे व स्वतःचे आयुष्य वाढणार आहे. तो जास्त दिवसांपर्यंत साठवून ठेवण्यास मदत होत आहे. साधारणपणे मे महिन्याच्या उत्पादित केलेला उन्हाळी कांदा हा डिसेंबर महिन्यापर्यंतचा साठवून ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. यातील जवळपास एक चतुर्थांश भागाप्रमाणे खराब कांदा होतो. या तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकऱ्यांच्या कांद्याची नासाडी ही थांबवले जाणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *