Indian Meteorological Department : देशातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार याचे 24 तासांमध्ये भारतासह राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याकडून आज देशात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण भारतात जोरदार पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळणार आहे.
IMD दिलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासामध्ये तामिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. त्यात सोबत पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तमिळनाडू, पदूचेरी कराईकल, किनारी आणि दक्षिण कर्नाटक, केरळ, माहे आणि लक्षद्वीप मध्ये ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तसेच इथल्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
हिवाळ्यात पावसाळा ?
बंगालचे उपसागरावरील भाषण वाऱ्यांमुळे बुधवारपर्यंत संपूर्ण दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्ब मुळे मंगळवारी संपूर्ण उत्तर भारत आणि लगतच्या भागात वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
यामुळे 9 जानेवारी रोजी जम्मू-काश्मीर लडाख गिलगिट बाल्टीस्तान मुजफराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फ वृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.