Vande Bharat Express : मनमाड ते जालना रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. यामुळे जालना येथून सध्या जनशताब्दी एक्सप्रेस विजेवर धावत आहे. या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे आता जालना जिल्हा येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, ‘रावसाहेब दानवे’ यांच्या प्रयत्नातून 30 डिसेंबर पासून नियमित वंदे भारत रेल्वे धावणार आहे. त्याची तयारी रेल्वे विभागाने सुरू केलेली आहे. त्यामुळे जालना करांना नवीन वर्षात जालना ते मुंबई असा वंदे भारत रेल्वेने चांगलाच आरामदायी प्रवास करता येणार आहे. आरामदायी प्रवास आणि सुविधा असल्याने या रेल्वे प्रवासाचे दर देखील सर्वाधिक असतील असे रेल्वे सूत्रांनी म्हटले आहे.
भारत देशातील सर्व रेल्वे मार्ग यांचे 2023 अखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. यामुळे मनमाड ते मुदत खेड दरम्यान विद्युतीकरणाचे काम मंजूर करून, जालना ते रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेले असून, जालना येथून जनशताब्दी एक्सप्रेस ही विद्युतीकरणावर धाव घेत आहे. या जनशताब्दी रेल्वेला जनतेने मोठी पसंती दिली आहे. दिवसा मुंबईला जाण्यासाठी जालना आणि छत्रपती संभाजी नगर येथील प्रवासी या रेल्वेला सर्वाधिक पसंती देत आहे. रेल्वेच्या यशस्वी प्रयोगानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून ‘वंदे भारत’ ही रेल्वे जालना येथील सुरू करण्याच्या हालचाली चालू आहेत.
आजच्या घडीला देशात 34 ‘वंदे भारत रेल्वे’ सुरू आहेत. आता जालना इथूनही लवकरच वंदे भारत, ही रेल्वे सुसाट धाव घेणार असून, ती विजेवर चालणार आहे. जालना व छत्रपती संभाजी नगर येथील पर्यटकांना मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी नंतर जालना येथून ही दुसरी रेल्वे असणार आहे. नवीन वर्षामध्ये ती पर्यटकांच्या सेवेत दाखल होईल, वंदे भारत रेल्वेच्या मार्गाचे जालना रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरण संपूर्ण झालेले असून, येत्या 30 डिसेंबर पासून जालना ते मुंबई ही वंदे भारत रेल्वे जालना रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात यावी. यामुळे विभागाने गतिमान केल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात वंदे भारत रेल्वेचा सुसाट आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना अनुभवता येणार आहे. जालना ते मुंबई हे अंतर जवळपास 428 किलोमीटर आहे.
सर्व सुविधा नियुक्त रेल्वे सेवा
जालना रेल्वे स्थानकावरून ३० डिसेंबर पासून ‘वंदे भारत रेल्वे’ ही रेल्वे नियमित पाठी सव्वा 5 वाजताच्या सुमारास धाव घेणार आहे. ही रेल्वे सकाळी पावणे 12 वाजता मुंबई येथे दाखल होणार. असून, मुंबई येथील एक ते दीडच्या दरम्यान जाण्यासाठी सुटणार आहे. ही रेल्वे सर्व सुविधा नियुक्त असणार आहे. या वंदे भारत रेल्वेला 8 डबे असून एकावेळी सुमारे 500 वाहतूक होणारा असून ॲडव्हान्स बुकिंग वरच ही रेल्वे धावणार आहे.
जनशताब्दी एक्सप्रेस राहणार कायम
जालना रेल्वे स्थानकावरून वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यानंतर जालना येथून धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस कायम सुरू राहणार. असून, रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. की जालना व छत्रपती संभाजी नगर येथील, प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी दोन एक्सप्रेस रेल्वे उपलब्ध होणार आहेत.