Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ बाबत अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अंदाजात चक्रीवादळाची दाट क्षण शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यानुसार 3 डिसेंबर दरम्यान बंगालच्या दक्षिण व पश्चिम खाडीत एक चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे. याचा प्रभाव ओडिसापर्यंत पोहोचू शकणार आहे.
चक्रीवादळ बाबत बोलताना हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलं की, संभाव्य चक्रीवादळाचा मार्ग आणि इतर बाबींबद्दल लगेच सांगता येणार नाही. ओडिसा किंवा इतर किनारपट्टीला या वादळामुळे जास्त धोका आहे की नाही, याबाबत काही सांगितलेले नाही. येत्या चार दिवसात उडीसा किनारपट्टीला इशारा नाही. ओडिसा किनारपट्टीवर असलेल्या मच्छीमारां नाही कोणता आहे इशारा दिलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडू पावसाने तुफान वातावरण निर्माण केले आहे. तमिळनाडू सुद्धा चक्रीवादळासाठी तयार होत आहे. 4 डिसेंबरला तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला चक्रीवादळ मीचांग धडकण्याची दाट शक्यता आहे. तर तमिळनाडूचे उत्तर किनारपट्टी, पुदुचेरी, कराईकलचया नागरिकांना 3 डिसेंबर रोजी मुसळदार पावसाचा तर 4 डिसेंबरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे.
चक्रीवादळ मीचाग हिंदी महासागरातील यंदाच्या वर्षात सहावा तर बंगालच्या खाडीतलं चौथं वादळ असणार आहे. या चक्रीवादळाला म्यानमारने नाव दिलं होतं. हवामान विभागाने अंदमान, निकोबार बेटांसह ओडिषा पावसाची दाट शक्यता व्यक्त केली आहे.