Cotton Market : राज्याची स्थिती बघायचे म्हटले तर, सध्या राज्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसात गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलेले आहे. अशाच शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर येत आहे. की राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशी भागातील प्रमुख कापूसपदक पट्ट्यांमधील शेतकऱ्यांसाठी विशेष राहणार आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने दिवाळीनंतर पुन्हा एकदा सजले आहे. बाजारात आता तेजी येऊ लागलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आशा पुन्हा एकदा जागृत झाले आहेत. तज्ञ लोकांच्या मते कापसाच्या भावात आगामी काळात आणखी तेजी येणार असल्याचे अंदाज व्यक्त केलेला आहे.
तज्ञ बाजार अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे यंदा खरीप हंगामामध्ये कमी पाऊस झाला होता. याच परिणाम म्हणून यंदा कापसाचे उत्पादन घटलेले आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशांमधील जवळपास सर्वच प्रमुख कापूस उत्पादक राज्यामध्ये यंदा कमी पावसामुळे उत्पादनामध्ये घट येणार आहे.
तमिळनाडू पहायचे झाले तर, यंदा तिथे कापसाचे उत्पन्नामध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्राचा विचार केला असता, आपल्या राज्यामध्ये कमी पाऊस आणि गुलाबी बोंड आळी वाढल्यामुळे पादुर्भाव यामुळे उत्पादनामुळे सर्वाधिक घट झालेली आहे. शेतकऱ्यांना पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळालेले नाही.
यंदा जर आपण पाहिला गेलो तर, एकरी उतारा खूपच कमी आलेला आहे. यामुळे आता कापसाचे भाव वाढू शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. दिवाळी पूर्वी महाराष्ट्रात कापसाचे भाव MSP अर्थातच हमीभाव अपेक्षा कमी होते. पण गेल्या काही दिवसांपासून बाजारातील ही परिस्थिती बदललेली दिसून येत आहे.
सध्याच्या घडीला कापसाचे भाव MSP च्या वर गेले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा असा मिळालेला आहे. बाजारात आलेली ही तेजी पाहता, शेतकरी गेल्यावर्षी जमा झालेला साठा, आणि नुकताच वेचणी झालेला कापूस बाजारात विक्रीसाठी आणू लागलेले आहेत.
ज्या शेतकऱ्यांना अजून पैशाची निकड नाहीये त्या शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढेल. या आशेने कापसाची साठवणूक केली आहे. त्यामुळे बाजारात अजूनही मालाची आवक खूपच कमी असल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून अजून देशातील जिनिंग व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत सध्या देशातील फक्त 40 टक्के जिनिंग व्यवसाय सुरू झालेले आहेत.
बाजारामध्ये कापसाचे आवक कमी असल्याने कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वाढत आहे. गुलाबी बोंड आळी आणि हवामानाच्या अनियमितपणामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मुंबईच्या आकडेवारीनुसार, 2023-2023 या आर्थिक वर्षामध्ये गुजरात 1516000 टन कापसाचे उत्पादन झालेले आहे.