Maharashtra Weather Forecast | राज्यात गणरायाच्या आगमना सोबत होणार मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये गेल्या तीन चार दिवसांपासून अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे आता गणरायाच्या आगमना सोबत मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. राज्यातील काही ठिकाणी मंगळवारी पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे.

राज्यात काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे मंगळवारी घरात गणरायाच्या आगमन होत आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढत लाडक्या बाप्पाला आपल्या घरी आणि सार्वजनिक गणेश मंडळात आणण्यात येत आहे गणरायाच्या स्वागतासाठी सुद्धा पाऊस असणार आहे हवामान विभागाने पुणे मुंबई सह राज्यातील पाच जिल्ह्यांना दिलेला इशारा आहे . पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे राज्यातील अन्य भागात ग्रीन अलर्ट असणार आहे परंतु सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

आगामी पाच दिवस पावसाचे

लाडक्या गणरायाचे स्वागत पावसाने झाल्यानंतर पुढील पाच दिवस पावसाचे असणार आहेत राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज 24 सप्टेंबर पर्यंत दिलेला आहे विदर्भात 23 सप्टेंबर पर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे मध्य प्रदेशात यामुळे जोरदार पाऊस सुरू झालेला आहे.

मुंबई आणि नाशिक मधील अनेक भागात पाऊस

मुंबई मुंबई उपनगर ठाणे कल्याण जिल्ह्यातील सोमवारपासून पाऊस सुरू आहे मंगळवारी सकाळी अंबरनाथ उल्हासनगर मध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे नाशिक शहरांमध्ये पाऊस सुरू आहे नाशिकच्या डोंगरे वस्तीग्रह मैदानावर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल आहेत या ठिकाणी पावसामुळे दुकानांमध्ये पाणी शिरले आहेत. शहापूर सह ग्रामीण भागात तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

पुणे शहरात मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता

पुणे शहरांमधील मंगळवारी हवामान ढगाळ राहणार आहे. पुण्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु पुणे विभागातील घाट विभागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे मंगळवारी अनेक ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे.

Leave a Comment