SSC HSC EXAM : दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचे निर्णय शिक्षण मंत्रालयाने यांनी जाहीर केला आहे. या निर्णय बाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत कशी असणार बोर्डाची परीक्षा व कशी असेल परीक्षेमधील गुण सर्व माहिती खालील प्रमाणे असेल .( Big decision for 10th and 12th students)
(Major changes in 12th 10th exam) बारावी व दहावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांनी घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेमध्ये मोठे बदल होणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून बोर्डाची परीक्षा दोनदा देता येईल. या दोन्ही परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळण्याची संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बारावी व दहावी परीक्षा दोनदा घेण्यात येणार असल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट केलेले आहेत
हे पण वाचा: केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
विद्यार्थ्यांना परीक्षा देणे सुलभ व्हावे आणि चांगले गुण मिळावे यासाठी या दृष्टिकोनातून बोर्डाची परीक्षा आता वर्षातून दोनदा घेण्यात येईल याकरिता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाची आखणी करून 2024 च्या शैक्षणिक धोरणासाठी पाठ पुस्तके तयार करण्यात येणार आहे. अभ्यास पूर्ण झालेल्या विषयांचा विद्यार्थ्यांना पेपर देण्यात येईल. व या द्वारे विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवण्याची संधी मिळेल.
राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद केल्यानुसार भविष्यात मागणीनुसार परीक्षा (ओन डिमांड ) करण्याकडे वाटचाल करणे अतिशय शक्य होणार असल्याचे ही केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयाने सध्या बोर्डाचे कठीण परीक्षा पद्धती आता विद्यार्थ्यांना दिलासादायक सुद्धा ठरणार आहे व अधिक सोपी परीक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रालयाचा प्रयत्न आहे.
आता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना विषय निवडीचे मिळणार स्वातंत्र्य
केंद्रीय मंत्रालयाच्या अभ्यासक्रम आराखड्यानुसार इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यासक्रम करावा लागणार आहे. या भाषांमध्ये एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे तसेच अकरावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी विषय निवडीचे स्वतंत्र असेल .
विद्यार्थी आता कोणत्याही विद्याशाखेतील विषय निवडू शकतील त्यामुळे यापुढील काळात विज्ञान कला वाणिज्य येथील कोणत्याही एकाच शाखेतून अभ्यास करण्याचे बंधन असणार नाही व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचे स्वातंत्र दिले जाणार आहे असे केंद्रीय मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.