Ladki Bahin Yojana: राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजना पुन्हा चर्चेत आलेली आहे. तिचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात सुरू असलेली महिलांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया. सध्या राज्य शासनाकडून चार नोव्हेंबर रोजी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि अनेक महिलांचे खात्यात पैसा जमा झालेला आहे परंतु अशी अपडेट समोर येत आहे की काही महिलांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती Ladki Bahin Yojana
राज्याचे माजी मुख्यमंत्री व तथा उपमुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै 2025 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना महिलांसाठी खरोखरच खूप मोठी ठरली आहे आणि महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु या योजनेमुळे सरकार वरती मोठा आर्थिक ताण येत आहे. अनेक ठिकाणी बातम्या समोर आल्या आहेत की शासनाने या योजनेचा हप्ता देण्यासाठी वेगवेगळ्या योजनेचे पैसे या योजनेसाठी वळवले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
परंतु या योजनेचे अर्ज प्रक्रिया सुरू असताना या योजनेत काही गैरप्रकार देखील समोर आलेला आहे. काही ठिकाणी पुरुषांनी महिलांचे नावे अर्ज भरून पैसे उचलले तर काहींनी डुबलीकेट अर्ज देऊन पैसे उचलले. यामुळे शासन अशा अर्जांवरती आता कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे या योजनेची पुन्हा छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि या छाननी प्रक्रियेमध्ये जवळपास 20 ते 25 लाख महिला अपात्र झालेले आहेत. तर योग्य महिलांना आणि पात्र असणाऱ्या महिलांना लाभ देण्यासाठी शासनाने केवायसी प्रक्रिया देखील राबवलेले आहे त्यामुळे ज्या महिलांनी e KYC अशा प्रक्रिया पूर्ण केल्या आहे अशाच महिलांच्या खात्यावरती हा हप्ता जमा झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
लाडक्या बहिणी योजनेची केव्हाशी कशी करणार
जर तुम्ही देखील लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल, तिथे लाभार्थी महिलेचे आधार कार्ड व तिच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ची गरज भासणार आहे. या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक टाकून लिंक असलेल्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल. तो इथे भरावा लागणार आहे आणि सहजरीत्या तुमची केव्हाशी प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
ऑक्टोबर चा हप्ता जमा झाला का?
तर राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती पोस्ट करत एक माहिती दिली आहे की राज्यातील महिलांना चार नोव्हेंबर पासून महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेले आहे. आणि पुढच्या दोन ते तीन दिवसात संपूर्ण महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. ज्या महिलांच्या खात्यावरती अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांनी काही काळ वाट पाहावी. जर जमा झाले नाही तर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे तर एकदा ते चेक करा तसेच या योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात का हे देखील पहा जर तुम्ही या दोन्हीही गोष्टी पूर्ण केल्या असतील तर तुम्ही महिला व बालविकास विभागांमध्ये जाऊन तक्रार नोंदवू शकता.
हे पण वाचा | लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 5 टक्क्यांनी घटली, आणखीन कमी होणार, नेमकं कारण काय?