Vande Bharat Express : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लवकरच भारत सरकारांतर्गत, या नवीन चार वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. देशभरातील वेगवान आणि आधुनिक प्रवासाचा नवा अनुभव देणारी ही गाडी आता लोकांच्या दारामध्ये पोहोचणार आहे. रेल्वे कडून नुकताच या चार नव्या वंदे भारत एक्सप्रेस ला मंजुरी देण्यात आलेली असून लवकरच या गाड्यांचा शुभारंभ होणार आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, या गाड्या बेंगलुरु-एरणाकुलम, फिरोजपुर दिल्ली, वाराणसी खजुराहो आणि लखनऊ शहापूर या मार्गांवर्ती धावणार आहे. या मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे. दक्षिण भारत, उत्तर भारत आणि मध्य भारतातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
या नव्या चार गाड्या सह देशात एकूण 164 वंदे एक्सप्रेस धावणार आहेत, म्हणजेच रेल्वेचा नवा इतिहास घडत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून जोरदार तयारी सुरू आहे आणि उद्घाटनाची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नाहीतर भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचे प्रतिक आहे. तिच्या प्रत्येक फेरीत प्रवाशांना वेग आराम आणि सुरक्षितेचा अनुभव मिळतो. मागील वर्षभरात वंदे भारत गाड्यांची लोकप्रियता अधिकच वाढत चाललेली आहे तिची ऑक्युपन्सी 105 टक्क्यांवर गेली आहे म्हणजे जागा संपल्या तरी लोकांची मागणी वाढतच आहे.
तर याबाबत बोल असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली, नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्याने प्रवाशांचा प्रवास आणखी सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. आता मुंबईहून पुण्याला जाणार असो किंवा लखनऊ शहापूरला जाणार वेळ वाचून सुखाचा प्रवास होणार आहे.
हे पण वाचा | आता विमानाचा प्रवास विसराल; रेल्वे ‘या’ 6 मार्गावर सुरु करणार विमानापेक्षा भारी वंदे भारत ट्रेन, कसा राहणार रूट ?