Sbi Bank Job News | राज्यातील तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, जर तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये आता थेट ऑफिसर लेवल भरती सुरू झालेली असून यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही बातमी खरोखरच आनंदाची आहे. Sbi Bank Job News
स्टेट बँक ऑफ इंडिया ने (SBI) स्पेशलिस्ट स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (Deputy Manager – Economist) या पदासाठी नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ८ ऑक्टोबर २०२५ पासून उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२५ आहे.
मुलांनी या भरतीसाठी sbi.bank.in यादवकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे. बँकेने सांगितल्याप्रमाणे ही भरती रेगुलर बेसिसवर म्हणजे कायमस्वरूपी पद्धतीने केली जाणार आहे.
– पदाचं नाव – Deputy Manager
एकूण जागा – 03
– ग्रेड -MMGS-II
– पगार श्रेणी – ₹64,820 ते ₹93,960 बेसिक पगार, याशिवाय महागाई भत्ता, प्रवास भत्ता, भारी भत्ता आणि इतर अनेक सुविधा मिळतील.
– नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई किंवा देशात कोणत्याही ठिकाणी.
– अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2025
– अधिकृत संकेतस्थळ sbi.bank.in
या भरतीत सर्वात मोठा फायदा म्हणजे लेखी परीक्षा नाही. उमेदवारांना प्रथम शॉर्टलिस्ट करून थेट इंटरव्यू साठी बोलवलं जाणार आहे. मुलाखत एकूण शंभर गुणांची असेल आणि त्याच्यावरून निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून Economics/ Econometrics/ Mathematics Economics/ Financial Economics या विषयात 60 टक्क्यावरून अधिक गुणासह मास्टर पदवी असावी. तसेच उच्च शिक्षण असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय किमान एक वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा :
१ ऑगस्ट २००२५ रोजी उमेदवाराचं वय 30 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क : सामान्य/ OBC/ EWS उमेदवारांसाठी ₹750 SC/ST/ PWBD उमेदवारांसाठी -शुल्क माफ
अर्ज कसा कराल?
– SBI.BANK.IN या वेबसाईटला भेट द्या.
– Career विभागात Recruitment of Specialists Cadre Officer on Regular Basis हा पर्याय निवडा.
Apply Online वर क्लिक करा. नवीन उमेदवार असल्यास Click For New Registration वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी करा. नंतर लॉगिन करून संपूर्ण फॉर्म काळजीपूर्वक भरा, आवश्यक कागदपत्र अपलोड करा आणि शुल्क भरून सबमिट करा. शेवटी अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. कारण SBI सारख्या प्रतिष्ठित बँकेत थेट अधिकारी पदावर भरती वन म्हणजे भविष्यातील सुरक्षित आणि स्थिर करिअरची हमी. अनेक तरुण सुद्धा तयारी करत असतानाच ही नोकरी परीक्षा शिवाय थेट मुलाखतीतून मिळणारी संधी असलेले मोठी मागणी दिसत आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा करण्यातील तारखेनंतर वेबसाईट बंद होईल.
हे पण वाचा | नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे ही खास ऑफर