पांढऱ्या सोन्याला काय मिळतोय दर? वाचा नवीन कापूस बाजार भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Market Rate | सध्या बाजारामध्ये सणासुदीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे, एकीकडे सराफ बाजारात गर्दी तर दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकीकडे दागिन्यांच्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सोने जवळपास एक लाख वीस हजारांच्या आसपास पोहोचले आहे परंतु शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून आणि घाम गाळून पिकवलेलं पांढर सोनं याला कुठेही योग्य मोल मिळत नाही. सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच कापूस पिकाला काय दर मिळत आहे असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे चला तर जाणून घेऊया नवीन बाजार भाव Cotton Market Rate

लवकरच आता शेतकऱ्यांचं पांढरे सोने बाजारामध्ये येणार आहे. खर तर यावर्षी या पिकावरती मोठा काळ कोसळलेला आहे. मागच्या दोन-तीन वर्षापासून आपण बाजार भाव बघत आहोत योग्य भाव कुठेच मिळत नाही. 2023 पासून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळालाच नाही. दरवर्षी काबाड कष्ट करून खर्च करून शेतकरी हे पीक पिकवतो, परंतु त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. काही शेतकरी म्हणतात आम्ही शेतात केलेली मेहनत तर राहू द्या, पण केलेला खर्च देखील निघत नाही. किती कशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते. परंतु यात मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात हेमंत घातल्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शासनाकडून मदत जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांना दिवाळी ही आता कोरड्यावरती करावी लागणार आहे. शेतामध्ये काहीच उरला नाही सोयाबीन बी वाहून गेले आणि कापूस पिक पण खराब झाले. आता आमच्या मुलांना नवीन कपडे कसे घ्यायचे आम्ही दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न देखील शेतकऱ्यांवर उपस्थित होत आहे. उरल्या सुरल्या कापसाला काय दर आहेत हे पाहण्यासाठी खालील दिलेली माहिती वाचा.

आजचा कापसाचा भाव

केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025- 26 साठी मध्यम भागाच्या कापसाचा किमान आधारभूत दर (MSP) ₹7,710 प्रतिक्विंटल जाहीर केला आहे. म्हणजेच बाजारात त्यापेक्षा कमी भाव मिळाल्या शेतकऱ्यांना सरकारी दरावर हमी दिली जाईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत हवामान आणि उत्पादन दोन्ही गोष्टींनी बाजारावर मोठा परिणाम केलाय.

कृषी विभागाच्या तिसऱ्या अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार, महाराष्ट्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत 14.75 टक्क्यांनी कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पण ज्या भागात पूर आणि अति पावसाचा संकट आलं, तिथे उत्पादनावर परिणाम होणार हे नक्की.

त्याआधी आपण बाजारभावाचा इतिहास पाहिला तर ऑक्टोबर 2022 मध्ये कापूस होता ₹8632 प्रतिक्विंटल, ऑक्टोबर 2023 मध्ये ₹7,173 तर ऑक्टोबर 2024 मध्ये 7,424 प्रतिक्विंटल दर मिळाला होता. या आकडेवारीवरून पाहता, सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर 2025 मध्ये कापसाचे दर ₹7,310 ते ₹7820 प्रतिकुंत्र इतके राहण्याची शक्यता आहे म्हणजे भाव स्थिर असला तरी मोठी वाढ दिसत नाही.  

तज्ञांच्या मते देशभरात कापसाची आवक कमी झाली आहे. ऑगस्ट नगर 25 मध्ये देशात आलेल्या कापसाचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 63 टक्क्यांनी घटला आहे. यामुळे बाजारात थोडा ताण आहे. पण USDA- FAS च्या अहवालानुसार, भारताचा एकूण उत्पादन 25.4 दशलक्ष बेल्स एवढं राहिल असा अंदाज आहे.  काही शेतकरी आता कापसाऐवजी डाळी, मका, भात अशा पिकांकडे वळत आहेत, कारण त्यात परतावा जास्त मिळत आहे. तसेच दिवाळीपूर्वी कापसाला काय दर मिळतील हे पाहण्यासारखे राहणार आहे.

हे पण वाचा | पांढरे सोने चमकले..! कापसाचे बाजार भाव वाढले, पहा आजचे कापुस बाजार भाव

Leave a Comment

error: Content is protected !!