Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा कमबॅक! या 9 जिल्ह्यांना थेट अलर्ट, हवामान विभागाचा नवीन इशारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक करायची तयारी सुरू केली आहे. गेले काही दिवस पासून अधूनमधून सरी पडल्या, कुठे उन्हाने हैराण केलं, तर कुठे शेतकरी डोळे लावून आभाळाकडे बघत होते. पण आता हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार कमबॅक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ९ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इथे थेट ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे, म्हणजे नागरिकांनी खबरदारी नक्कीच घ्यायला हवी. पालघरसोबतच नाशिक घाटमाथ्यावर देखील मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज असून तिथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात डोंगर दऱ्यांमधून धबधबे कोसळतील, नद्या-नाले या ठिकाणी पूर येऊ शकतात आणि खेड्यापाड्या मध्ये रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच रस्त्यांवर पाणी साचण्याची, रेल्वे वाहतूक उशीर होण्याची झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचसोबत पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याने तिथेही यलो अलर्ट (Yellow alert) दिला गेला आहे. पुणे शहरात मात्र हलक्या सरी पडतील असं सांगण्यात आलंय, पण मावळ, भोर, खेड या डोंगराळ पट्ट्यात पावसाचा जोर नक्कीच जाणवेल.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. या किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहील, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे, मात्र साताऱ्याच्या घाटमाथ्यावर थोडा जास्त पाऊस होऊ शकतो.

विदर्भातही पावसाचा इशारा दिला गेला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित असून तिथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत हलक्या सरी पडतील, आकाश ढगाळ राहील असं सांगितलं आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव या भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा असल्याने तिथेही यलो अलर्ट देण्यात आलाय.

थोडक्यात सांगायचं तर, महाराष्ट्रातल्या अनेक भागांत ७ सप्टेंबर रोजी पाऊस जोर धरू शकतो. शेतकरी बांधवांनी शेतात उभी असलेली पिकं, जनावरे यांची काळजी घ्यावी तर नागरिकांनी शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा, नद्या-नाल्यांच्या काठावर न जाण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

(अशाच हवामान अपडेट साठी डिजिटल पोर्ट पोर्टलला फॉलो करा.)

Leave a Comment

error: Content is protected !!