पाटोदा तालुक्यातून जाणारा पैठण पंढरपूर मार्गाचे काम पूर्ण करण्यात यावे आ सुरेश आण्णा धस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंढरपूर रस्त्याचे काम बरेच दिवसापासून सुरू झालेले असून. तर काही ठिकाणी अद्याप काम पूर्ण झालेले नाही तर काही ठिकाणी कामाची सुरुवात अद्याप ही झालेली नाही.

तसेच काही ठिकाणी काम अर्धे वट झालेले असून हा रस्ता संत एकनाथ महाराज पालखीचा महामार्ग (पैठण पंढरपुर) आहे . दरवर्षी या रस्त्याने खूप मोठ्या प्रमाणत वारकरी संप्रदाय पैठण पंढरपूर असा प्रवास करत असतात.

या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या रस्त्याचे काम बरेच दिवसांपासून रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण न झाल्या मोठे अपघात या रस्त्यात वर होत असतात.त्वरित या रस्त्याचे काम पूर्ण करावे नागरिकांचे मागणी आहे की
पैठण पंढरपूर रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून राखडलेले आहे.नागरिकांना या रस्त्याचा बरेच दिवसांपासून त्रास होत आहे माननीय विधान परिषद सदस्य आ.सुरेश आण्णा धस (बीड लातूर धाराशिव) यानी नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे उपाधिकारी पाटोदा यांना निवेदन दिले आहे.
या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी देखील केली आहे .
नागरिकांना या रस्त्यामुळे जीव गमवा लागला आहे काही ठिकाणी मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत पाटोदा तालुक्यातील मळेकरवाडी , डोंगरकिनी फाटा, चुंबळी फाटा, पाटोदा शहरातील रस्ता, व पुल, पारगाव घुमरा या ठिकाणी गेली. अनेक वर्षापासून काम रखडलेले असन इथे अनेक घटना घडलेल्या आहेत. खूप दिवसांपासून या गावातल्या लोकांना या रस्त्यामुळे खूप त्रास होत आहे. त्याकरिता या काम त्वरित सुरू करावे एजन्सी कॉन्ट्रॅक्टदार यांना त्वरित काम पूर्ण करावे. यासाठी आदेश देण्यात यावे असे निवेदन पत्र सांगितले आहे आ सुरेश आण्णा धस असे निवेदन पत्र दिले

Leave a Comment

error: Content is protected !!