Post Office Scheme : महा महागाईच्या चिंते मुळे भविष्यात गाठीशी काही रक्कम रहावी. अडचणीच्या काळात बचत उपयोगी पडावी, यासाठी बचतीचे महत्व वाढले आहेत. सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून टपाल खात्याच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांवर नागरिकांचा भरोसा असल्याचं सिद्ध झालं आहे. मनी 9 ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात बचत करणाऱ्या कुटुंबाची संख्या वाढल्याचे हे समोर आले आहे. 2022 मध्ये 70 टक्के कुटुंब बचत करीत होते. आता हा आकडा म्हणजेच, 2024 मध्ये 80 टक्कें वर पोहोचला आहे.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत ₹54 हजार रुपये जमा केल्यावर इतक्या वर्षांनी ₹14.20 लाख मिळतील
पैशांची बचत करण्यावर जोर
आता बचत करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली आहे. आणि बचतीच्या पद्धतीतही बदल झाला आहे. सध्याच्या काही आकड्यांनी याविषयीची माहिती समोर आणली आहे. बँकेत रक्कम जमा करणाऱ्यांची संख्या 2022 च्या तुलनेत त 77 टक्के पर्यंत वाढली आहे. यापूर्वी हा आकडा 64 टक्क्यावर होता. बँकेतील बचतीवर व्याज वाढल्याने, ही संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा माघारी बोलवण्याचा निर्णय, पण त्यासाठी कारणीभूत मानण्यात येत आहे. कारण या काळात अनेक लोकांनी गुलाबी नोटा बचत खात्यात एफडी स्वरूपात जमा केल्याचे समोर आले आहेत.
सोन्याच्या किमती झाल्या पुन्हा कमी, जाणून घ्या कमीत-कमी 10 ग्रॅम ची किंमत
विमा खरेदीत वाढ
देशातील नागरिकांचा सर्वाधिक कल विमा खरेदीकडे असल्याचे समोर आले आहे. आणि कोरोना काळात उपचारांसाठी ही मोठी रक्कम खर्ची पडल्याने नागरिकांनी आता विम्याचा पर्याय निवडला आहे. गेल्या वर्षात 19 टक्के कुटुंबांनी विमा खरेदी केला, तर 2023 मध्ये सर्वेक्षण समोर आले आहे. त्यानुसार विमा खरेदीदार कुटुंबीयांचा आकडा 27% पर्यंत वाढला आहे. विमा खरेदी तेजीने होत, असल्याचे समोर आले आहे.Post Office Scheme
शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट..! नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, ते चेक करा
पोस्ट ऑफिस नवीन ट्रेड
बचतीचा नवीन ट्रेड समोर येत आहे. टपाल खात्यातील योजनेत बचत करण्यावर भर देण्यात येत आहे. आणि पोस्ट कार्यालयाच्या वेगवेगळ्या अल्पबचत योजनेत पैसा जमा करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 2022 मध्ये अशी कुटुंब 21 टक्के होती. यावर्षी 2024 मध्ये हा आकडा 31 टक्के पर्यंत वाढला आहे. या अल्पबचत योजनांवर चांगले व्याज मिळतं असल्याने नागरिक या योजनांकडे वळले आहे. तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबांची संख्या 15 टक्के होऊन 21 टक्क्या पर्यंत पोहोचली आहे.