Farmer Subsidy Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा कापूस व सोयाबीन पिकासाठी पाच हजार अनुदानाचा जीआर निघाला आहे. या निर्णयाची कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने अंमलबजावणी केली आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात 5 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. Farmer Subsidy Yojana
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने जाहीर केला आहे. सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे कापूस व सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचबरोबर झालेल्या उत्पादित मालाला योग्य तो बाजार भाव देखील न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते.
मात्र मारुती सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी हे अनुदान देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पाडले आहेत. त्याबाबतचा आज शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे.
रेशनकार्डधारकांसाठी मोठी बातमी! आजपासून नवीन नियम लागू, आता मोफत रेशनसोबतच मिळणार मोठा फायदा
राज्य सरकारच्या या निर्णयाची कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लगेच अंमलबजावणी केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान हजार रुपये तर हे दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548 कोटी 34 लाख रुपये इतके तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लाख रुपये असे एकूण 4192 कोटी 68 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुदानासाठी ज्या शेतकऱ्याने एपिक पाहणी द्वारे पीक पाणी केले आहे त्या शेतकऱ्यास अनुदानासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. महाडीबीटी द्वारे हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केले जाणार आहे.
शेतकरी पती-पत्नी दोघांनाही मिळणार 18 व्या हप्त्याचे 4,000 रुपये! या दिवशी पैसे होणार जमा
या निर्णयामुळे राज्यातील मागील वर्षी आर्थिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयास तातडीने निधी उपलब्ध करून दिल्या बाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार मानले आहे. Farmer Subsidy Yojana