Rain Alert in Maharashtra: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पुण्यासह दिल्लीत येल्लो अलर्ट जरी करण्यात आले आहे. राज्यातील कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
दररोज हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात देखील जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून पुढील तीन ते चार दिवस पावसाची स्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. Rain Alert in Maharashtra
मुंबईला झोपून काढणाऱ्या पावसाचा जोर काहीशा प्रमाणात ओसरला आहे. दिवसभरात केवळ 13 महिने पावसाची नोंद झाली असून पुढील चार दिवसासाठी मुसळधार पावसाचा इशारा मात्र कायम आहे. आज सकाळपासून अनेक भागात रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे. याचा परिणाम मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर झाला असून, या ठिकाणच्या रेल्वे दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत.
या तारखेला मिळणार लाडकी बहिण योजनेचे पैसे? अजित पवार यांनी दिली मोठी अपडेट, 3000 रुपये होणार एक सोबत जमा
राज्यात सकाळी आठ वाजेपर्यंत 13.74 मिमी पावसाची नोंद झाली असून, यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुलाबा 14.3 मीमी तर सांताक्रुज 15.9 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शहर मिमी पूर्वपनगर 17.93 मीमी तर पश्चिम उपनगर 18.42 मिमी पाऊस झाला आहे.
कोल्हापूर मध्ये पुराची स्थिती
कोल्हापूर मध्ये गेल्या काही दिवसापासून लगातार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असून, पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या नदीची पातळी धोक्यापासून एक फूट खाली आहे. 43 फुटाची मर्यादा ओलांडल्यानंतर ती धोकादायक पातळी मानली जाते. त्यामुळे ही चिंताजनक बातमी आहे असे मानले जाते.
घरबसल्या नवीन पॅन कार्ड तयार करा, एकदम मोफत, असा करा ऑनलाइन अर्ज
कोल्हापूरमध्ये पूर येण्याची स्थिती निर्माण झाल्यापासून रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. अनेक गाड्या मिरज मार्गे वळवण्यात आले आहेत. याशिवाय कोल्हापूर मधून जाणारे महामार्ग अंदाज घेऊन बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी धोकादायक पातळीवर येऊन पोहोचलीआहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 2019, 2021 मधील स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला असून, पुणे शहरात संपूर्ण रस्त्यावर पाणी झाले आहे. शहरातील नागरिकांना कामानिमित्त बाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे.
4 thoughts on “महाराष्ट्रातील या भागात मुसळधार पावसाचा इशारा! मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी..”