Police Recruitment Schedule: नमस्कार मित्रांनो, राज्यात आज पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे वेळापत्रक मध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यात 17471 पदासाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.
पोलीस भरतीचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशातच एक मोठी अपडेट समोर आली असून पोलीस भरतीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहे. पाऊस पडलेल्या ठिकाणी उमेदवारांना नवीन तारीख देण्यात आलेली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 185 पोलीस शिपाई रिक्त पदाची भरती प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती. मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदानी चाचणी घेणे योग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.
आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची मैदानी चाचणी 23 जून रोजी होणार आहे. तर 21 जून आणि 22 जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदानी चाचणी आता 27 जून रोजी घेतली जाणार आहे. पोलीस मुख्यालय आयुक्त संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. Police Recruitment Schedule
PM आवास योजनेची ग्रामीण यादी जाहीर! या यादित ज्याचे नाव आहे त्यांनाच मिळणार 1,20,000 रुपयांची आर्थिक मदत, यादीत नाव पहा
पोलीस भरतीच्या या वेळापत्रक मधील बदल नवी मुंबई येथे होणाऱ्या भरती प्रक्रिये बाबत घेण्यात आला आहे. या मैदानी चाचणीत उमेदवारांना भरती देताना कुठल्याही प्रकारची जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर ठिकाणी नियोजन प्रमाणे भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.
17471 पदासाठी महाराष्ट्र राज्यात तब्बल 17 लाख 56 हजार 256 अर्ज सादर करण्यात आले आहेत. हे अर्ज सादर करणाऱ्यात उच्चशिक्षित तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. डॉक्टर, वकील, एमबीबीएस आणि बी. टेक केलेले उमेदवार पोलीस भरती प्रक्रियेसाठी मैदानात उतरले आहेत. त्याचबरोबर राज्यातील रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी तरुण यंदाच्या पोलीस भरती उपक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत.
2 thoughts on “पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय! पोलीस भरतीचे वेळापत्रक बदलले, नवीन तारीख पहा”