IMD MONSOON Forecast | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. मान्सून पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत असून पुढील तीन ते दोन दिवस मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. IMD MONSOON Forecast
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यामध्ये मान्सून धुमाकूळ घालणार आहे. शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाले. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलय मोठे नुकसान देखील झालेले आहे. व नागरिकांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. आजही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असेल तर पुढील दोन ते तीन दिवस मान्सून मुंबईमध्ये धडकणार असेल त्यानंतर मान्सूनच्या सरी कोसळतील.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील आणि मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील हवामान विभागाकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे.
या काळामध्ये नुसता पाऊस पडणार नसून महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याच काळामध्ये राज्यातील वाऱ्याचा वेग 50 ते 60 किमी इतका असणार आहे.
व तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून नागरिकांची उष्णतेपासून सुटका झालेली आहे. परंतु राज्यात पुढील 48 तास सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.