Agricultural Compensation Fund : – गेल्या पावसाळी हंगामात सतत झालेल्या पावसामुळे शेत पिकाचे नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे. जर तुमच्या अकाउंट E-KYC झाली नसेल तर लवकरात आपल्या अकाउंट ची E- KYC करा.
राज्यातील 3 लाख इ केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून 210 कोटी तीस लाख रुपयांचा मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची परिक्रिया दिनांक 28 ऑगस्ट 2023 पासून सुरू झाली आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते हा निधी वितरित करण्यात आलेला आहे श्री मंत्री अनिल पाटील यांनी संगणक्य प्रणालीवर कमल बटन दाबून निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गेल्या पावसाळी हंगामामध्ये सतत झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान भरपाई शासनाने विशेष बाब म्हणून पंधराशे कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणाली मार्फत निधी वितरण सुरू केले आहे.
आज मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री श्री अनिल पाटील यांनी हा निधी वितरण बाबत आढावा घेतला यावेळी ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. व हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
E- KYC करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच शुक्रवार पर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांकरिता ₹ 178.25 कोटी निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस बोलताना सांगितली त्याचप्रमाणे शेत पिकांच्या नुकसान करिता तातडीने मदत मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन ई -केवायसी करण्याचे मंत्री अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना आव्हान दिले.
व E- KYC करण्याची सेवा निशुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली तसेच डीबीटी प्रणाली मध्येही काही तूट असल्यास त्यांना त्रुटी देखील तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या शासन शेतकऱ्यांपर्यंत असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे निधीचा कमतरता भासून देणार नाही असे असे त्यांनी यावेळी सांगितले.
व तसेच शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर E-KYC करून घेण्याच्या सूचना देखील सर्व तहसील व जिल्हा यंत्रणांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या.