12th Board Exam Results 2024 | उद्या लागणार बारावीचा निकाल या वेबसाईटवर पाहता येणार झिरो मिनिटांमध्ये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Board Exam Results 2024 | राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वपूर्ण बातमी झळकू लागली आहे. ती म्हणजे बारावीचा निकाल उद्या लागणार आहे. परंतु याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. राज्य मंडळाचे नऊ विभागीय मंडळामार्फत 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आलेली होती. या दरम्यान निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रतीक्षा लागलेली आहे. 12th Board Exam Results 2024

राज्यामध्ये जवळपास बारावीच्या 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू झालेले आहे सायंकाळी मतदान संपले. निकालांची तारीख जाहीर होऊ शकते. उद्या निकाल लागू शकतो अशी माहिती सोशल मीडियावर वायरल होत आहे. पण अद्याप याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दहावी बारावीचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या वर्षी या दरम्यान राज्य मंडळाने बारावीचा निकाल 25 मे रोजी जाहीर केला होता. तसेच दहावीचा निकाल ही दोन जून रोजी जाहीर केलेला होता. मात्र गेल्यावर्षी पेक्षा लवकरच निकाल जाहीर होण्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावरती अशी च चर्चा रंगलेली आहे. महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा व शेवटचा टप्पा पार पडताच निकाल जाहीर होणार असे सांगण्यात येत आहे.

बारावीचा निकाल नेमका कधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण देत बोर्डाच्या वतीने यादी सूचना सुद्धा जारी केलेल्या होत्या. राज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये तिसरा आठवड्यात तर दहावीचा निकाल जाहीर करण्याची नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अगदी २१ मे तारीख नक्की नसली तरी आज पासन सुरू झालेल्या आठवड्यामध्ये निकाल समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!