शुभमंगल सामूहिक विवाह योजना: महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुराच्या मुलीच्या सामूहिक विवाह साठी ही योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी/ शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाह साठी आवश्यक असलेले मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रतिजोडपे 10000 रुपये एवढे अनुदान देण्यात येत आहे. सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रतिजोडप्या मागे दोन हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन विवाह समारंभाचा खर्च तसेच विवाह नोंदणी शुल्क हाक होणारा खर्च भरण्यासाठी देण्यात येतो.
या योजनेबाबत नियोजन व वित्त विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्याच्य स्तरावर योजना राबवण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या/ शेतमजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाह साठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना राबवणे साठी शासन निर्णय दिनांक 7 मे 2018 निर्गमित करण्यात आलेल्या आदेशातील अटी व व शर्तीमध्ये शासन निर्णयाचे खालील प्रमाणे आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेला पात्र होण्यासाठी वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये इतके असायला पाहिजे असा कुटुंबातील मुलींच्या विवाह साठी प्रति जोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान वस्तूच्या आईच्या नावाने आई हयात नसल्यास वडीलाच्या नावाने व आई वडील दोन्ही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येईल. या योजनेसाठी पात्र वधूचे वय अठरा वर्ष पेक्षा जास्त असायला पाहिजे. या योजनेअंतर्गत वधूचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा जास्त असल्यास अनुदानास पात्र राहणार नाही.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला कमी वेळात कागदपत्राची छाननी करणे जोडण्याची पात्रता निश्चित करणे इत्यादी गोष्टी शक्य व्हावे, याकरिता एका स्वयंसेवी संस्थेत एका सोहळ्यात किमान पाच व कमाल शंभर जोडप्याचा समावेश करणे परवानगी आहे. एका संस्थेला वर्षातून दोनच सामूहिक विवाह समारंभ आयोजित करता येतील त्यापेक्षा जास्त सामूहिक विवाह सोहळे केल्यास कोणतेही शासकीय अनुदान मिळणार नाही.
हे पण वाचा:- या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शुभमंगल सामूहिक विवाह योजना साठी आवश्यक कागदपत्रे:-
- कोणत्या गावचा रहिवासी आहे त्या पत्या बाबत ग्रामसेवक/ तलाठी चा दाखला.
- किमान मुलीचे वय 18 वर्ष आहे यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- तहसीलदार ने दिलेले उत्पन्नाच्या दाखला
वरील सर्व कागदपत्रे व अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात एक महिना अगोदर सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जाती विशेष मागास प्रवर्ग, या प्रवर्गातील दांपत्य पात्र राहणार नाही. कारण त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वातंत्र्य योजना राबवण्यात येत आहेत.
इतर अटी व शर्ती
- वधू ही महाराष्ट्र तील संबंधित जिल्ह्याची असावी.
- विवाह सोहळ्याच्या दिनांक पोराचे वय 21 वर्षे वधूचे वय 18 वर्षे अपेक्षा कमी नसू नये.
नोंदणीकृत विवाहला पण मिळणार दहा हजार रुपये अनुदान
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेअंतर्गत जे जोडपे सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता, सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी कृती विवाह करतील त्यांनाही दहा हजार रुपये अनुदान देण्यात यावे या योजनेचा मुख्य हेतू आहे की गरीब शेतकरी /शेतमजूर यांच्यावर विवाह सोहळ्याच्या आर्थिक बोजा पडू नये त्यांच्यासाठी त्यांना कर्ज घ्यावा लागू नये या दृष्टीने नोंदणीकृत विवाह सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी जोडप्यांना कोणत्याही स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही व सामूहिक विवाह सोहळ्याच्या तारखेची वाट बघण्याची गरज पडत नाही. स्वतःहून विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन लग्न करता येते तसेच अगदी साध्या सोहळ्यात व कमी खर्चात नोंदणी कृत विवाह करता येते.
अशा जोडप्यांना सरळ दहा हजार इतके आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करून देण्यात यावे त्या जोडप्यांना फक्त नोंदणीकृत विवाह करावयाचा आहे त्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यात सामील होण्याचे बंधन राहणार नाही व नोंदणीकृत्व केल्यानंतर ही त्यांना पूर्ण अनुदान मिळेल.
हे पण वाचा:- महिलांना मिळणार मोफत सोलर शिगडी, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा