( नमो शेतकरी महा सन्मान निधी )
महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे. व या योजनेचा पहिला आता लवकर शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत म्हणून निधी दिला जातो. त्याचप्रमाणे नमो शेतकरी महासंबंधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दोन हजार रुपये हप्ता मिळणार आहे. आता शेतकऱ्याला वर्षाला बारा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या निर्णयाबाबत मंत्रिमंडळ बैठक झाली असून या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे याबाबत सर्व माहिती महाराष्ट्र शासनाच्या महासंवाद या अधिकृत संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीमध्ये या योजनेचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी आता केंद्र व राज्य सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांना 12 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना शासन निर्णय-
सन 2023-24 अर्थसंकल्पनीय भाषणामध्ये घोषित केलेल्या शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य सरकार अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महा सन्मान निधी ही योजना 2023-24 राबवण्यास मान्यता देत आहे.
या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत-
नवीन आलेल्या GR नुसार या योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन केलेले असेल व पी एम किसान पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले असेल ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये मिळतात त्या शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहेत. जर पीएम किसन पोर्टलवर नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
निधी वितरणाची कार्यपद्धती-
या योजनेसाठी PM KISHAN योजनेनुसार खालील प्रमाणे लाभार्थ्याला लाभ मिळेल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटे या योजनेअंतर्गत पैसे जमा होतील.
- पहिला हप्ता – 2000 हजार रुपये
- दुसरा हप्ता – 2000 हजार रुपये
- तिसरा हप्ता -2000 हजार रुपये
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळणार आहे तसेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये असे दोन्हीही मिळून शेतकऱ्याला 12000 रुपये प्रति वर्ष मिळणार आहे.