गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना; आता शेतकऱ्यांना भेटणार 2 लाख रुपये?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना:– राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशीच ही एक योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी चालू करण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू करण्यात आली होती. विमा कंपन्याचा या योजनेमध्ये सहभाग होता प्रीमियम न भरल्यामुळे काही काळासाठी ही योजना बंद झाली होती खंडित कालावधीमध्ये आलेल्या दाव्यांना कृषी विभागाकडून अनुमती देण्यात आली आहे. यामुळे 830 दाव्यांचे शेतकऱ्यांना 16 कोटी 48 लाख रुपये देण्यात येणार आहेत. कृषी विभागातर्फे राज्य शासनाकडे प्रस्ताव आला आहे व शासनाकडे निधी मागवण्यात आला आहे.

Gopinath Munde Insurance Scheme या योजनेची किती नुकसान भरपाई मिळेल?

2015 – 2016 मध्ये राज्य सरकार द्वारे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू करण्यात आली होती.

  • या योजनेच्या अंतर्गत अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून सरकार दोन लाख रुपये आर्थिक मदत देते.
  • तसेच अपघातामध्ये शेतकऱ्यास अपंगत्व झाले तर सरकार नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपयाची आर्थिक मदत देते.

या योजनेसाठी विमा कंपन्या राज्य सरकारकडून प्रीमियम घेत होते परंतु विमा कंपन्यांची निवड न झाल्याने प्रीमियम बंद पडला होता. प्रीमियम बंद झाल्यामुळे या कालावधीत आपल्याला दिव्यावर निर्णय होऊ शकत नव्हता त्यामुळे मृत शेतकऱ्याच्या वारसांना तसेच अपघात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

राज्य सरकारकडून कृषी विभागाला या खंडित कालावधीमध्ये विमा द्यावे असा निकाल करण्यासाठी मान्यता देण्यात आली. राज्यातील खंडित कालावधी मधील विमा दाव्यांना मंजूर देणे मंजुरी देण्यात आली यातून शेतकऱ्यांना 16 कोटी 48 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे.

हे पण वाचा:-

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती विमा योजना शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातात वीज पडणे, पूर येणे ,सर्पदंश, विंचुदवंश विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातात रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारा अपघात त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा अपंगत्व येते.

शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे नाव बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे करण्यात आले आह. विमा योजना सन 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. दोन लाख विमा संरक्षणासह राबवण्यात शासनाचे मंजुरी देण्यात आली आहे.

योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच संपूर्ण दिवसाचे 24 तासासाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याला कधी पण अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही योजना होऊ शकते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना साठी लागणारे कागदपत्र:

  1. 7/12
  2. 6 क
  3. 6 ड (फेरफर)
  4. एफ. आय. आर
  5. पंचनामा
  6. पोस्टमार्टम रिपोर्ट
  7. व्हिसेरा रिपोर्ट
  8. दोष रोप
  9. दावा अर्ज
  10. वरसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
  11. घोषणापत्र अ व घोषणापत्र ब
  12. वयाचा दाखला
  13. तालुका कृषी अधिकारी पत्र
  14. अकस्मातमृत्यूची खबर
  15. घटना स्थळ पंचनामा
  16. वाहन चालवण्याची वैध परवाना
  17. अपंगत्वाचा दाखला व फोटो
  18. औषध उपचाराचा कागदपत्र
  19. अपघात नोंदणी 45 दिवसाच्या आत करणे

हे पण वाचा

पदवीधरांना 1 लाख 12 हजार रुपये पगाराची नोकरी 1876 रिक्त जागा साठी भरती त्वरित अर्ज करा

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

हे पण वाचा

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

Leave a Comment

error: Content is protected !!