राज्यभरामध्ये उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणाऱ्या याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे गणपतीपर्यंत उडून राजाची कृपा अवघ्या महाराष्ट्र मध्ये असणार आहे उद्यापासून दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाला सुरुवात होईल व त्याच्यापुढे दोन दिवस म्हणजेच 16 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर वाढणार अशी माहिती मुंबईच्या हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पट्टा अधिकच गडब होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे राज्यभरात अनेक भागात पावसाचा जोर वाढणार असे सुषमा नारायण यांनी सांगितले गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबई सह उपनगरात 30 ते 32 अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे तसेच. आर्द्रताहि 80% पर्यंत गेल्यामुळे p मुलाचे चटके मुंबईकरांना प्रचंड हरण करत आहेत आता येत्या दोन दिवसात मुंबईतही मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कुठे पडणार पाऊस पहा
- 14 ते 15 सप्टेंबर विदर्भ आणि मराठवाड्यात
- 16 ते 17 सप्टेंबर कोकण सह मध्य महाराष्ट्रत
- भंडारा-गोंदिया गडचिरोली या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
- मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात विजांच्या कडकडासह पावसाचा इशारा