अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे – अंगणवाडी भरती सुरु झाली आहे . या साठी कोणती शैक्षणिक पात्रता लागते व वय याची अट फी आणि अर्ज कोठे करयचा आहे या सर्व गोष्ठीची माहिती खाली देलेली आहे.
अंगणवाडी मध्ये मदतनीस सेविका पदांची भारती निघाली आहे. अंगणवाडी सेविका हि एक महत्वाची सदस्य आहे जी अंगणवाडी केंद्रामध्ये काम करते . मुलाची काळजी घेणे , पोषण शिक्षण आणि आरोग्य ची काळजी घेणे इत्यादी त्यांचे मुख्य कार्य आहे.
अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागद पत्रे
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नचे प्रमाण पत्र
- मूळ गावाचे रहिवाशी असलेल्या रहिवाशी दाखला
- अंगणवाडी सेविका पदासाठी किमान दहावी पास असणे गरजचे आहे.
- जर उमेदवारांनी दहवी पेक्षा जास्त शिक्षण केले असेल तर त्या शिक्षणाचे प्रमाणपत्र
जर तुम्हाला अंगणवाडी सेविका भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर वर दिलेले सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
अंगणवाडी भरती साठी वयोमर्यादा :–
- अर्ज करणाऱ्या उमेदवार महिलांचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे . फक्त या वया गटातील महिला अर्ज करू शकतात.
- उमेदवाराचे टी. सी ची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी भरतीसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
- भरतीसाठी महिला महाराष्ट्र मधील मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे
अंगणवाडी भरती साठी अर्ज करण्या साठी इथे क्लीक करा
हे पण वाचा – Crop insurance – असा भरा 1 रु मध्ये पीक विमा
Click here to join WhatsApp group – Join
अंगणवाडी सेविकाचे कार्य –
शिक्षण आणि प्रशिक्षण: अंगणवाडी सेविकांना संबंधित सरकारी प्रशिक्षण कार्यक्रम आणि योजनांद्वारे विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. यामुळे त्यांना मुलांचे वय आणि विविध वयोगटांच्या गरजा समजण्यास मदत होते.
मुलांची काळजी घेणे : सेवकाचे मुख्य काम म्हणजे मुलांची काळजी घेणे. ती मुलांचे सकस आहार, आंघोळ, स्वच्छता, खेळ, उपक्रम आणि औषधे वेळोवेळी काळजी घेते.
पोषण सेवा: अंगणवाडी सेविका मुलांना पोषण सेवा पुरवतात. यामध्ये त्यांना योग्य आहार, पोषक आहार, जीवनसत्त्वे आणि पूरक आहार, बाळांना लसीकरण कार्यक्रम द्यावे लागतात.
सामुदायिक सेवा: सेविकाला तिच्या सामुदायिक सेवांद्वारे मुलांना आणि मातांना शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा, नागरिकत्व आणि सरकारी योजनांबद्दल जागरुक करावे लागते.
सामूहिक उपक्रम: अंगणवाडी सेविका ग्रामीण सभा, जागृती कार्यक्रम, आराम समितीचे समर्थन, आंतर-विभाजन ठराव, इत्यादी विविध सामूहिक उपक्रम देखील करतात.