मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; योजना – आज दिनाक ४ जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या च्या विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे. मराठा कुणबी विद्यार्थ्यांसाठी प्रदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती ; सयाजीराव गायकवाड या योजनेस मान्यता दिली आहे. व मराठा कुणबी समाजाला मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ होणार आहे .
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती; ‘सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती’ योजनेस मान्यता
- राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी ‘सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस मान्यता
- या योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार
- या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत नाही, ही बाब लक्षात घेऊन’ क्यु-एस वर्ल्ड रैंकिग’ मध्ये २००च्या मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार.
ही योजना २०२३ – २४ पासून राबविण्यात येणार.
● अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य- अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि २५ डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती मिळणार.
या योजनेसाठी ५ वर्षाकरिता २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता.
हे पण वाचा :- अंगणवाडी भरती साठी लागणारी कागदपत्रे
Click here to join WhatsApp group-join