अण्णासाहेब पाटील कर्ज योजना : युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज, तेही 0%टक्के व्याज दारावर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

युवकांना मिळणार 15 लाखापर्यंत कर्ज -: महाराष्ट्रातील युवकांसाठी आनंदाची बातमी आता युवकांना 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल. आतापर्यंत 18.28 कोटी रुपयांची वाटप , या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना चांगलाच हातभार मिळणार आहे., आतापर्यंत 310 युवकांना कर्ज. तर मित्रांनो विचार काय करताय तुम्ही पण करा अर्ज, मित्रांनो आपण या लेख मध्ये पाहणार आहोत नेमकं कोण देणार कर्ज व काय असणार याची परतफेड अर्ज कुठे करावा आणि जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ :- तर मित्रांनो ही योजना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या नावाने राबवली जात आहे. या योजनेचे माध्यमातून बेरोजगार युवकांना कुठल्याही प्रकारचा व्याज न घेता कर्ज दिले जाते., महाराष्ट्रातील बेरोजगार संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हे लक्षात घेत या योजनेतून बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी घडून येत आहे या योजनेअंतर्गत मराठा समाजातील बेरोजगार तरुणापर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे व रोजगारात संधी उपलब्ध करून देणे. व उद्योग जग बनवून विचार असणाऱ्या तरुणांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ बद्दल थोडक्यात माहिती :- या योजनेचे माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे व ते स्वतःचे उद्योग सुरू करावे यासाठी अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळातर्फे विविध व्यवसायांसाठी कर्ज दिले जात आहे. जसे की वैयक्तिक योजनेतून कर्ज घेतल्यास 15 लाखापर्यंत कर्जाचे व्याज महामंडळ भरते .

या योजने अंतर्गत येणारी योजना वैयक्तिक कर्ज योजना या योजनेसाठी आतापर्यंत 835 युवकांनी अर्ज केले असून त्यामधील 310 युवकांना कर्ज मंजूर केले आहे. त्यातील 289 जणांचे 2 कोटी 21 लाख 54 हजार 732 रुपयांचे व्याज महामंडळाने भरले आहे. तर गट कर्ज व्याज परतावा योजनेतून 50 लाख पर्यंत कर्ज घेतल्यास त्याचे व्याज देखील महामंडळ भरते . या योजनेची माध्यमातून युवकांची स्वप्न साकार होत आहे. जे युवक स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा स्वप्न पाहत होते परंतु त्यांना पैशाची अडचण येत होती. हे विचार घेता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेतून गरजू युवकांना कर्ज देते.

महामंडळाची स्थापना :-आर्थिक दुर्बल घटकाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. जेणेकरून मराठा समाजातील बेरोजगारांच्या स्वप्नाला साखर करण्याचे काम महामंडळ करते,बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी ही योजना राबवली जाते. युवकांना त्यांच्या व्यवसायामध्ये उंच उडान घेवी स्वतःचा व्यवसाय मोठा करावा, या साठी वैयक्तिक लोन (personal loan) ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे माध्यमातून युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून युवकांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येईल.

या योजनेतून आतापर्यंत कर्ज घेण्यासाठी 835 युवकांनी अर्ज केले असून महामंडळाकडून व्याज भरतीसाठी 289 युवक कर्जदार पात्र ठरले आहे, या 289 युवकांचा कर्ज महामंडळाने भरले आहे.

गट कर्ज योजना या योजनेअंतर्गत मिळू शकते 50 लाख पर्यंत कर्ज :-

  • दोन, व्यक्तीसाठी 25 लाख
  • तीन ,व्यक्तीसाठी 35 लाख
  • चार ,व्यक्तीसाठी 45 लाख
  • पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती असल्यास त्यांना 50 लाख पर्यंत मिळतें कर्ज,

या योजनेसाठी अटी व शर्ती :-

  • वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष इतकी असावी.
  • या योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत असावे.
  • लाभार्थ्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेला अर्ज कसा करावा :-

या योजनेला अर्ज करण्यासाठी पुढील दिलेल्या साइटवर क्लिक करा व अर्ज भरावा.

टीप :- वैयक्तिक कर्ज योजनेचे कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पात्र ठरलेल्या कर्जदाराची व्याज महामंडळाकडून भरले जात आहे कर्ज घ्यायचे असल्यास संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

हे पण वाचा :- पंतप्रधान नरेंद्रर मोदी यांची मोठी घोषणा या योजनेचा होणार नागरिकांनाा मोठा फायद पहा संपूर्ण माहिती.

Leave a Comment

error: Content is protected !!