आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंटने समृद्ध आहे, ज्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. आवळा चवीला कडू असल्यामुळे तुम्ही त्याचा जाम किंवा लोणचं करून मुलांना खायला देऊ शकता.
काळे तीळ मेलेनिनचे प्रमाण वाढवते, आपल्या त्वचेचा आणि केसांचा रंग राखण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही लहान मुलांना काळ्या तिळाचे लाडू खायला देऊ शकता किंवा काळ्या तिळाची पावडर करून पासून बनवलेले पदार्थही खायला देऊ शकता
मनुका हा लोहाचा उत्तम खजिना आहे. त्यात व्हिटॅमिन सी देखील असते, जे लोह लवकर शोषून घेते आणि केसांना पुरवते. यामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या तर दूर होतेच पण केस गळती देखील दूर होते.
कढीपत्त्यात भरपूर जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि बी 12 असतात. याशिवाय त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील असते. यामुळे केस गळणे आणि पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.
देशी तुपाचा वापर जेवणात केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांची गुणवत्ता ठरवते.