Tur Rate | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बाजार समितीमध्ये तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेला काही दिवसांपासून तुरीच्या दारामध्ये सातत्याने वाढ होत आहे पाहता पाहता चक्क तूर दोन हजार रुपयांनी वाढली आहे.
अनेक बाजार समितीमध्ये तुरीने दहा हजाराचा टप्पा पार केला आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार तुरीला जवळपास 11000 भाव मिळालेला आहे. ही बातमी पाहून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व अशाच बातमीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि खाली दिलेला व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा.(Tur Rate)
(शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)
तुरीला मिळाला 11000 भाव Tur Rate (Turi got 11000 bhava)
तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापसाचे भाव जरी कमी असले तरी तुरीने आता उंचाअंकी गाठली आहे. जालना बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीची 1704 क्विंटल आवक झालेली आहे. इथे तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे. कमाल दहा हजार पाचशे पन्नास ते किमान 7711 रुपये तसेच सर्वसाधारण व 9 हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळालेला आहे.
तसेच अकोला बाजार समितीमध्ये देखील तुरीला सर्वाधिक दर मिळाला आहे. इथे 2205 क्विंटल लाल तुरीची आवक झाली आहे. तसेच दहा हजार पाचशे पन्नास ते आठ हजार सहाशे पन्नास इतका दर मिळाला आहे. व इथे सरासरी 9750 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये हिंगणघाट बाजार समितीत आज चार हजार 781 क्विंटल लाल तुरीची आवक झाली आहे. इथे तुरीला दहा हजार तीनशे पंधरा ते आठ हजार इतका दर मिळाला आहे. तसेच सरासरी 8 हजार 800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.
हे पण वाचा | कांद्याच्या घरात मोठी घसरण आजचे बाजार भाव जाणून घ्या
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
सध्या तुरीला चांगला भाव मिळत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पिकाला कमी भाव मिळत असल्याने, शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सोयाबीन पीक आणि कापूस पीक शेतकऱ्यांनी घरामध्ये साठवून ठेवली आहे. या पिकांना तुरीप्रमाणे कधी दर मिळणार अशा अशाने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये तुरीला आज नऊ हजार पाचशे ते नऊ हजार 999 या दरम्यान दर मिळालेला आहे. तज्ञांचे मते हे दर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.