Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना सर्वत्र मोठा चर्चेचा विषय बनली आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गेमचेंजर ठरली आहे. यामुळे महायुती सरकारला मोठे यश प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये देऊ अशा आश्वासन माहितीने दिले होते. महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले मात्र अजून याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. पुढील महिन्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का नाही हे स्पष्ट होईल.
आता मात्र या योजनेच्या नियमामध्ये बदल केल्या जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालवण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. आयकर विभागाच्या मदतीने कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाणारा असून, ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल त्या कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे पण वाचा | तुमच्या खात्यात अनुदानाचे पैसे आले का नाही? नेमके कोणत्या योजनेचे पैसे खात्यात आले जाणून घ्या..
लाडकी बहीण योजनेत लवकरच मोठे बदल होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबद्दल माहिती घेण्यासाठी आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना लाभ दिला असला तरी आता या योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.
सरकारच्या नवीन निर्णयानुसार लाडकी बहीण या योजनेचे सामाजिक परीक्षण केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसह अन्य विविध योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या महिलांना देखील या योजनेतून वगळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ज्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे अशा कुटुंबातील लाभार्थ्यांना या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या योजनेची पडताळणी सुरू आहे अशा अनेक बातम्या तुम्ही ऐकले असतील. पडताळणी दरम्यान निकषात न बसणाऱ्या महिला या योजनेतून अपात्र ठरविण्यात येत आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 1,500 रुपये या दिवशी जमा होणार; जाणून घ्या तारीख आणि वेळ?
दरवर्षी ई केवायसी करावी लागणार
लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी व या योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले आहे. या योजनेअंतर्गत 2 कोटी 41 महिला पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तसेच दरवर्षी जूनमध्ये लाभार्थ्यांना आपली सगळी माहिती ई केवायसीद्वारे द्यावी लागणार आहे. आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल दोन कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली आहे. मात्र यापैकी फक्त दोन कोटी 41 लाख महिलाच पात्र ठरल्या आहेत. उर्वरित सर्व लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. Majhi Ladki Bahin Yojana
हे पण वाचा | लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार फेब्रुवारी महिन्याचे पैसे; अजित पवारांनी केले मोठं वक्तव्य..
2100 रुपयाचा वाढीव हप्ता मिळणार का नाही?
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता मिळाली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू अशा आश्वासन महायुती सरकारच्या बड्या नेत्यांनी दिले होते. मात्र अजून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा वाढीव हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये यावर विचार करू असे सांगितले होते. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात या योजनेत काय सुधारणा होतील हे पाहण्यासारखे राहणार आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये मिळणार का नाही हे स्पष्ट होईल.
1 thought on “लाडकी बहीण योजनेच्या नियमात मोठा बदल! राज्य सरकारने लढवली नवीन शक्कल…”