Maharashtra Municipal Election | राज्याच्या राजकारणाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेले आहे राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत. गाव पातळी पासून तर शहरापर्यंत सत्तेचा फैसला करणाऱ्या निवडणुकीच्या तारखेला स्पष्ट करण्यात आलेले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वेळापत्रक आता हळूहळू पष्ट होत चाललेला आहे आणि या बातमीने संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष वेधून घेतलेल आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलं की या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 च्या दरम्यान पार पाडणार आहेत. Maharashtra Municipal Election
निवडणूक आयोगाची मोठी माहिती
राज्यामध्ये निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे झालेल्या विभागीय बैठकीत याबाबत माहिती दिली. या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असून VVPAT मशीन चा वापर मात्र यावेळी होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केला आहे.
या बैठकीमध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर इतर जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. त्यातून नवी प्रभाग रचना व OBC आरक्षणासह या निवडणुकांना मंजुरी देण्यात आली असल्याच जाहीर केलं.
मुंबईत जुन्यांच प्रभाग रचनेनुसार मतदान
मुंबई महानगरपालिकेसाठी एक वेगळीच घोषणा झालेली आहे. इथे पुरेप्रमाणे 227 एका सदस्य प्रभाग रचना लागू राहणार आहे. मा विकास आघाडी सरकारने हे प्रभाग 236 पर्यंत वाढवले होते, मात्र सत्ता बदलानंतर महायुती सरकारने हे पुन्हा 227 वर आणले. यावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती, पण ती फेटाळण्यात आली. त्यामुळे आता मुंबईकरांनी 227 प्रभागांच्या आधारे मतदान करायचे आहे.
मुंबई वगळता बाकीच्या मोठ्या महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग असणार आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. हे अ, ब आणि क वर्गातील महापालिका मानल्या जातात आणि त्यांची प्रभाग रचना त्याप्रमाणे केली जाईल.
दिवाळीनंतर राज्याच तापमान वाढणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे गावपातळीच्या नेतृत्वाची खरी चाचणी असते. हा रणसंग्राम लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सर्व पाहता येणाऱ्या निवडणुका अनेक राजकीय समीकरण बदलतील एवढं मात्र नक्की!