Government Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून सर्वोच्च स्तरातील घटकांना लाभ मिळावा म्हणून विविध योजना राबवण्यात येतात. यादरम्यान भूमिहीन शेतमजुरांना राज्य सरकारने अनुदान अंतर्गत बिनव्याजी कर्जाची योजना राबवलेली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेच्या माध्यमातून अनुदान आणि बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे.
या योजनेमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना राज्य शासनाकडून जमिनीत खरेदीसाठी वीस लाख रुपये देण्यात येणार आहेत. भूमिहीन मजुरांना दोन एकर ओल्या किंवा चार एकर कोरड्या जमिनीसाठी 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
भूमीहिन शेतमजुरांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये दोन एकर बागायती आणि चार एकर आहेत असे दोन विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये 16 लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शासनाकडून जमीन खरेदी करून ती भूमीही अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबाच्या पती किंवा पत्नीच्या नावावर केली जाते.
अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर कुटुंबाला चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे.
Government Scheme
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- भूमी शेतमजूर असल्याबाबत तहसीलदाराचा दाखला
- मागील वर्षाच्या दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत वहित प्रमाणपत्र
- शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
या योजनेसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत
विधवा महिलांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलंगच्या जमिनीचे वाटप केले त्यांना लाभ नाही. ही जमीन हस्तांतरित किंवा विकता येत नाही. बिनव्याजी कर्जाचा हप्ता दोन वर्षानंतर आसून, लाभार्थ्यांना बिनव्याजी दहा वर्षांमध्ये साठी कर्ज दिले जाते. कर्ज फेडीची सुरुवात कर्ज मंजुरीनंतर दोन वर्षांनी सुरू होते. लाभार्थ्याचे किमान वय 18 ते 60 वर्षे इतके असावे.
हे पण वाचा:-
💁♂️👇
या जिल्ह्यातील अग्रीम पीक विमा वाटपाला सुरुवात, पहा सविस्तर माहिती