Government New Rules | नवीन वर्ष सुरू झाले आहे व नवीन वर्षातील जानेवारी महिना पण संपत आला आहे. आता नवीन महिना सुरू होणार आहे नवीन महिने सोबतच सर्वसामान्यांना काही नवीन नियम देखील पाळावे लागणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात काही आर्थिक नियम बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, या नवीन नियमाचा परिणाम हा सर्वसामान्याच्या खिशाला बसणार आहे.
येणारे फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वभौम गोल्ड बॉड (SGB),NPS,IMPS,Fastag eKYC,SBI Home loan, इत्यादी अनेक नियम फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलणार आहेत.
NPS आंशिक पैसे काढण्याची नवीन नियम याप्रमाणे :
PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) 12 जानेवारी पर्यंत निधी आंशिक काढण्यासाठी व कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी एक परिपत्रक जारी केली होती. व आता याची अंमलबजावणी ही 1फेब्रुवारीपासून करण्यात येणार आहे. NPS खातेदार हे त्यांच्या वैयक्तिक पेन्शन खात्यातील योगदानाच्या 25% रक्कम पर्यंत काढू शकतात. पैसे काढण्याची विनंती मिळाल्यावर सरकारी नोडल कार्यालय प्राप्ति कर्त्याचे निर्देशक करणार आहे. याचबरोबर CRA तपासणीनंतर पैसे काढण्याची विनंती वर प्रक्रिया सुरू होणार आहे.
IMPS (Immediate Payment Service) नियमामध्ये होणार बदल
IMPS ही मनी ट्रान्सफर साठी एक पेमेंट सेवा आहे. याद्वारे तुम्ही कोणती त्वरित निधी पाठवू किंवा प्राप्त करू शकता. मोबाईल किंवा ऑनलाईन बँकिंग वापरून बँकेवर करू शकता. यामध्ये 1 फेब्रुवारीपासून काही बदल होणार आहेत त्यामध्ये पहिला बदल म्हणजे लाभार्थ्याचे नाव काही असले तरी तुम्ही तुमचे बँक खात्यात 5 लाख रुपये ट्रान्सफर करून शकणार आहात.
NPCI (नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ) गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केले होते . या परिपत्रकामध्ये असे होते की तुम्ही फक्त लाभार्थ्याचा फोन फोन नंबर किंवा बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवू शकतात. पण आता या नियमांमध्ये बदल होणार आहे.
SBI Home loan :
SBI द्वारे एक विशेष गृह कर्ज मोहीम चालवली जात आहे, या योजनेचे माध्यमातून बँकेची ग्राहक 65bps पर्यंत ग्रह कर्ज मध्ये सूट घेऊ शकतात. याव्यतिरिक्त प्रक्रिया शुल्क व ग्रह खर्चावर सूट देण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी आहे.
FASTag eKYC :
NHAI ( नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया) मी सांगितले की केवायसी पूर्ण न केल्यास, FASTag वापर करताना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार आहे. फास्टट्रॅक केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी आहे. या अगोदर तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करून घ्यावा अन्यथा तुमचे फास्टट्रॅक बंद होणार आहे.